पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ वॅ. ] संयुक्त जर्मनी. २९९ न मिळाल्यास घाबरून जाणारा पुरुष नव्हता ! पार्लमेंटची संमति मिळत नाहीं, तर पार्लमेंटच्या संमतीखेरीज आपणास इष्ट वाटत असलेली लष्करी सुधारणा घडवून आणण्यासाठी पैसे खर्च करण्याचें ठरवून, प्रिन्स बिस्मार्क नांवाच्या एका पुरुषास त्यानें आपल्या प्रधानमंडळांत बोलावून मुख्य प्रधानाची जागा दिली ( १८६२ ). प्रिन्स बिस्मार्क हा मुत्सद्दी असून प्रिन्स विस्मार्क. राजसत्तेचा कट्टा पुरस्कर्ता होता. प्रिन्स बिस्मार्कची मुख्य प्रधानाच्या जागेवर नेमणूक झाल्यावर पार्ल- मेंटची सत्ता हलके हलके संपुष्टांत येऊन सर्व सत्ता राजाच्या हातीं आली ! यावेळी डेन्मार्कच्या राज्यांत कांहीं गडबड झाल्यामुळे सर्व जर्मन संस्थानांचें लक्ष तिकडे वेधलें. श्लेझविंग व होलस्टेन • या प्रांतांमधील चळवळ. १८६३ मध्ये डेन्मार्कचा राजा ७ वा फ्रेडरीक मरण पावल्यावर, सर्व युरोपियन राष्ट्रांच्या संमतीनें त्याच्यानंतर ९ वा ख्रिश्चन गादीवर आला. या राजाबद्दल डेन्मार्कप्रमाणेंच श्लेझविंग व होल- स्टेन या दोन प्रांतांनीं आपली मान्यता दर्शविली होती; परंतु डेन्मार्कच्या राजानें एक जाहीरनामा काढून हे दोन प्रांत डेन्मार्कच्या राज्याशीं एक- 'जीव केल्याचे जाहीर करतांच, या दोन प्रांतांमधील जर्मन प्रजेनें आपला निषेध व्यक्त केला. या वेळीं १८४८ प्रमाणें त्या दोन प्रांतांच्या वतीनें जर्मनींतील सर्व संस्थानांनीं भाग घ्यावा असें सर्व जर्मन लोक म्हणूं लागले. तेव्हां डेन्मार्कच्या राजकारणांत हात शिरकविण्याची ही संधि न दवडण्या- साठीं प्रिन्स बिस्मार्क या मुत्सयानें आपल्या बाजूला आस्ट्रियाचें मन वळ- विलें, व १८६४ च्या जानेवारी महिन्यांत प्रशिया व आस्ट्रिया या -राष्ट्रांनी डेन्मार्कवर स्वारी केली. आक्टोबर महिन्याच्या सुमारास डेन्मार्कचा पूर्ण पराभव होऊन त्यास श्लेझविंग व होलस्टेन हे दोन प्रांत प्रशिया व आस्ट्रिया या राष्ट्रांच्या ताब्यांत द्यावे लागले.