पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १९ वें. संयुक्त जर्मनी. स्कून १८४८ मध्यें प्रशियाच्या राजाकडून तेथील जनतेस राज्य- "कारभाराचे कांही हक्क मिळाले होते. हे हक्क जरी तुटपुंजे होते, तरी लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या कल्पनेचा स्वीकार प्रशियासारख्या प्रतिगामी राष्ट्रानें केलेला पाहून, संयुक्त जर्मन पार्लमेंट स्थापन करण्याची कल्पना निघून १८४८ मध्येच त्यास मूर्त स्वरूप देण्यांत आलें. फ्रँक- फोर्ट येथें संयुक्त जर्मन पार्लमेंट स्थापन झाल्यावर संयुक्त जर्मनीचें एक संघटित राष्ट्र स्थापन करण्याची कल्पना बळावली ! फ्रँकफोर्ट येथें स्थापन झालेल्या पार्लमेंटकडून संयुक्त जर्मन राष्ट्र स्थापन करण्याच्या प्रत् कितपत यश आलें हें आपण पाहिलेंच आहे. १८४८ मध्ये बोलावण्यांत आलेल्या पार्लमेंटला जर्मनींतील कोणत्याच संस्थानिकांचें पाठबळ नसल्या- मुळें त्यावेळचा प्रयत्न फसला होता; परंतु जर्मनींतील एखाद्या बलाढ्य संस्थानाकडून अशा प्रकारच्या प्रयत्नास पाठबळ मिळालें तर हा प्रयत्न यशस्वी झाला असता यांत संदेह नाहीं ! १८५८ मध्ये प्रशियाच्या गादीवर आलेल्या वुइल्यमनें अशाप्रकारें संयुक्त जर्मनीचें एक संघटित राष्ट्र स्थापन करण्याची खटपट सुरू केली. आपल्या मनांतील सर्व हेतु साध्य करून घेण्यासाठीं आपणास सैन्याच्या मदतीची फारच आवश्यकता आहे हें कळून चुकल्यामुळे आपलें सैन्य कवाईत शिकवून उत्कृष्ट रीतीनें तयार ठेवण्याचा वुइल्यमनें उपक्रम सुरू केला ! परंतु आपलें प्रशियन सैन्य जय्यत तयार ठेवण्याच्या मार्गात एक अडचण उपस्थित झाली. प्रशियाच्या पार्लमेंटमध्यें शांततावादी सभासदांचें मताधिक्य असून, त्यांनी लष्करी खर्चासाठीं जादा रक्कम मंजूर करण्याचें साफ नाकारलें ! परंतु वुइल्यम हा पार्लमेंटकडून म