पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ वें. ] इटलीचें एकीकरण. २९७ बसली होती ! व्हिक्टर इमान्यूल व रोमन जनता यांना फार दिवस कांहीं योग्य संधि सांपडण्यासाठीं थांबावें लागलें नाहीं. १८७० मध्ये फ्रान्स व ताब्यांत येतें- १८७०. संयुक्त जर्मनी यांच्यामध्यें मोठें युद्ध उपस्थित रोम शहर इटलीच्या होऊन, नेपोलियन बादशहास रोम शहरीं असलेलें फ्रेंच सैन्य पॅरीस शहराच्या संरक्षणासाठी बोलाविणें भाग पडलें. रोममधून फ्रेंच सैन्याचा तळ हालल्यावर, लागलींच व्हिक्टर इमान्यूलनें आपलें सैन्य पाठवून रोम शहर काबीज केलें. संयुक्त इटलीच्या या कृत्याचा पोपनें निषेध केला ! परंतु विजयश्री मिळ- विणाऱ्या इटालियन सैन्यानें पोपच्या राजवाड्यास हात न लावतां त्यास सुरक्षित ठेवलें. त्या शहरीं जरी पोपचें वास्तव्य होतें, तरी सर्व इटालियन जनतेच्या इच्छेवरून इतिहासप्रसिद्ध पुरातन, वैभवशाली रोमशहरास संयुक्त इटलीच्या राजधानीचा मान देण्यांत आला ! १९