पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २ रें. जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. पंधराव्या व सोळाव्या शतकांत धर्मसुधारणेची लाट जर्मनीमध्यें पहिल्या प्रथम उत्पन्न होऊन ती हलके हलके युरोपमधील बहुतेक -सर्व देशांत पसरूं लागली. रोम शहरांतील पोपकडून सर्व ख्रिस्तीधर्मीय · लोकांकडून घेण्यांत येणारे कर, धर्माधिकाऱ्यांच्या हातांतील अमर्याद सत्ता, त्यांना असलेले विशिष्ट हक्क, धर्माधिकाऱ्यांचे विषयी व निंद्य वर्तन, या च अशा प्रकारच्या कित्येक गोष्टी पाहून ख्रिस्तीधर्मीय लोकांस पोपच्या -सत्तेविरुद्ध तिटकारा वाटूं लागला होता. या वेळीं सामान्य लोकांच्या ज्ञानांत भर पडून त्यांच्या विचारामध्यें क्रान्ति होत असल्यामुळे तर पोपच्या -सत्तेविरुद्ध सुरू झालेल्या चळवळीस जोर मिळून धर्मसुधारणा करण्याबद्दल -सामान्य जनतेचेंही पाठबळ मिळू लागलें. मध्ययुगाच्या शेवटीं प्राचीन कलावियांचे पुनरुज्जीवन झाल्यानें - सामान्य जनतेच्या ज्ञानांत भर पडून जी विचारक्रान्तीची लाट उत्पन्न झाली ती पहिल्या प्रथम इटलीमध्येच उद्भूत होऊन, तेथून उत्तरे- कडील राष्ट्रांमध्यें पसरली. परंतु इटलीमध्यें व उत्तरेकडील राष्ट्रांमध्यें या विचारकान्तीपासून निरनिराळे परिणाम झालेले दिसतात. कलाकौशल्याच्या गोष्टींमध्ये सुधारणा करावी असें इटलीमधील लोकांस वाटू लागलें तर इकडे उत्तरेकडील राष्ट्रं मात्र नैतिक सुधारणा करण्यामध्येच निमग्न राहिलीं ! इटलीमधील लोक अर्वाचीन युगाच्या सुरुवातीस शिल्पकला, चित्रकला, ऐहिक सुखवर्धनास इष्ट असलेल्या गोष्टी सुधारण्याकडे गुंतलेले असून उत्तरेकडील राष्ट्रांतील लोक मात्र ख्रिस्तीधर्माचीं उदात्त तत्त्वें काय आहेत व रोममधील धर्मगुरूंनी ख्रिस्तीधर्मास संमत नसलेले आचार- विचार त्या धर्मामध्ये कसकसे घुसडले आहेत, ग्रीक, लॅटिन व हिब्रू