पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण जून महिन्यांत प्रख्यात मुत्सद्दी काहूर हा जरी मरण पावला होता, तरी इटलीच्या राजानें काहूरचें धोरणच पुढे चालविण्याचें ठरविलें ! संयुक्त • इटलीच्या राजास आस्ट्रियाशीं दोन हात करून व्हेनिस प्रांत इटलीच्या राज्यास जोडण्याची योग्य संधि सांपडण्यासाठी मार्गप्रतीक्षा करण्यासाठी फार वेळ कांहीं थांबावें लागलें नाहीं. १८६६ च्या सुमारास आस्ट्रिया व प्रशिया या दोन संस्थानांतील जर्मनीमधील वर्चस्वासंबंधीं फार दिवस धुमसत असलेला मत्सराग्नि प्रदीप्त होऊन युद्ध सुरू झालें ! तेव्हां आतां आस्ट्रियावर शस्त्र उपसण्यास ही संधि बरी आहे असें वाटून इटलीनें प्रशियाबरोबर तह करून दक्षिणेकडून आस्ट्रियावर हल्ला करण्याचें • ठरविलें. परंतु दुर्दैवाने यावेळीं कस्टोझाच्या लढाईत ( जून १८६६ ) इटालियन सैन्याचा पराभव झाला, व ऑड्रिआटिक समुद्रांत लिसा बंदरा- नजीक असलेल्या इटालियन आरमाराचा पूर्ण फडशा पाडण्यांत आला ! परंतु तिकडे उत्तरेकडे, सँडोवाच्या लढाईत प्रशियन सैन्यानें आस्ट्रियन • सैन्याचा पूर्ण फडशा पाडल्यामुळे इटलीला वरील पराभवाचे परिणाम भोगावे लागले नाहींत ! प्रशियाकडून आस्ट्रियाचा पूर्ण पराभव झाल्यामुळें तह केल्यावांचून आस्ट्रियाला गत्यंतरच नव्हतें. या तहान्वयें आल्पस् पर्वताच्या दक्षिणेकडे असलेला व्हेनिस प्रांत संयुक्त इटलीस मिळून १८६६ च्या नोव्हेंबर महिन्यांत मोठ्या विजयश्रीने व्हिक्टर इमान्यूल राजानें प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या व्हेनिस शहरीं प्रवेश केला. आतां फक्त रोम शहरच इटलीच्या राजाच्या ताब्यांत यावयाचें राहिलें होतें, परंतु तें शहर या वेळीं फ्रेंच सैन्याच्या संरक्षणाखालीं असल्यानें रोमवर हल्ला केल्यास फ्रान्सशी इतक्यांतच टक्कर द्यावी लागेल या भीतीनें तसें न करतां योग्य संधि सांपडेपर्यंत थांबण्याचें व्हिक्टर • इमान्यूलनें ठरविलें. रोममधील रोमन लोकांनाही संयुक्त इटलीला मिळा- वाटत होते, परंतु फ्रेंच सैन्याच्या भीतीनें त्यांना तसे करतां येईना ! • योग्य संधि मिळण्याची मार्गप्रतीक्षा करीत रोममधील जनताही स्वस्थ