पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ वें. ] इटलीचें एकीकरण. २९५: आँबिया संस्थानांत पसरली, व तेथील लोकांनीं आपल्या जुलमी राजा- विरुद्ध चळवळ सुरू केली तेव्हां गॅरीबाल्डीनें तेथेंही आपल्या सैन्यानिशीं हल्ला करून तेथील जुलमी राजसत्ता मोडून टाकली. इकडे काहूरनें सार्डि- निया - पिडमांटच्या सैन्याच्या मदतीनें पोपचें संस्थान हस्तगत केलें होतें.. अशा प्रकारें १८६१ च्या सुमारास ईशान्येकडे आस्ट्रियाच्या ताब्यांत असलेला व्हेनीस हा प्रांत व इटलिच्या मध्यभागी फ्रेंच सैन्याच्या संरक्षणाखालीं असलेलें रोम शहर या दोन ठिकाणांखेरीज सर्व इटालियन द्वीपकल्प सार्डिनिया-पिडमाँटच्या राजाच्या हातांत होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! तेव्हां आतां ह्या दोन संस्थानांवर हल्ला करून तीं इतक्यांतच काबीज करावींत असें गॅरीबाल्डीचें म्हणणें होतें; परंतु तसें केल्यास आस्ट्रिया व फ्रान्स यांचें इतक्यांतच विनाकारण वैर संपादन करावें लागेल. असें काहूरचें म्हणणें पडल्यामुळे, व्हिक्टर इमान्युलला तो विचार तूर्त सोडून यावा लागला. तेव्हां आतां सार्डिनियाच्या ताब्यांत असलेल्या इटलीचें एकीकरण करणेंच तूर्त इष्ट आहे असें इटालियन देशभक्तांस वाटून पिडमाँटची राजधानी ट्युरीन येथें संयुक्त इटलीचें पार्लमेंट १८६१ च्या फेब्रुवारी महिन्यांत पहिल्या प्रथम बोलाविण्याचें ठरलें. इटालियन देशभक्तांच्या आकांक्षा आतां बहुतेक फलद्रूप झाल्यानंतर हें पार्लमेंट बोलाविण्यांत येत असल्यामुळे तेथील थाटाचा होऊन सर्वानुमतें संयुक्त इटलीचें राज्यपद व्हिक्टर इमान्यूल यास अर्पण करण्यांत आलें. व्हेनिस व रोम हीं दोन ठिकाणें आतां काबीज करावींत अशा गॅरीबाल्डीच्या एकसारख्या सूचना येत होत्या, परंतु तसें केल्यास संयुक्त इटलीच्या राष्ट्रा इतक्यांतच आस्ट्रिया व फ्रान्स या दोन प्रबळ राष्ट्रांकडून धोका येण्याचा संभव आहे असें वाटून, योग्य संधि मिळेपर्यंत वाट पाहण्याचें व्हिक्टर इमान्यूलनें ठरविलें. व्हिक्टर इमान्यूल संयुक्त इटलीचा राजा होतो- १८६१. एकंदर देखावा मोठा १८६१ च्या.