पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९४ व याखेरीज व्हाईन सार्डिनियाचा आस्ट्रि- याशीं तद- १८५९ नोव्हेंबर. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण नदीच्या बाजूनें प्रशिया आस्ट्रियाच्या वतीनें आपणा- वर स्वारी करण्यास उद्युक्त होईल अशी नेपो- लियनला भीति वाटत होती ! परंतु नेपोलियननें अचानक रीतीनें आस्ट्रियाशीं केलेल्या तहामुळे सार्डिनियाची स्थिति मात्र फारच चमत्कारिक झाली. आस्टियाशीं युद्ध चालविण्यास एकटें सार्डिनियाचें राष्ट्र अगदींच असमर्थ असल्यामुळे आस्ट्रियाशीं तह केल्यावांचून गत्यंतरच नव्हतें ! तेव्हां १८५९ च्या नोव्हेंबर महिन्यांत आस्ट्रियाशीं केलेल्या तहान्वयें सार्डिनियाला लाँबर्डी हा प्रांत मिळून, व्हेनिस हा प्रांत मात्र आस्ट्रियाच्या हवाली करावा लागला; व गेल्या युद्धांत नेपोलियननें सार्डिनियाला मदत केल्यामुळें फ्रान्स व सार्डिनिया - पिटमाँटच्या सरहद्दीवर असलेले सेव्हॉय व नीस हे दोन प्रांत फ्रान्सला यावे लागले ( १८६० ). सिसली व नेपल्स ह्रीं संस्थाने गॅरीवाल्डी आपल्या ताब्यांत घेतो अशा रीतीनें १८६० च्या सुमारास इटलीच्या उत्तरेकडील लाँचर्डी प्रदेश सार्डिनियाच्या ताब्यांत आल्यावर इटलीचा एकीकरणाचा मार्ग बराच सुलभ होईलसें काहूरला वाटूं लागलें. संयुक्त इटलीच्या एकीकरणा- च्या मार्गांत आड येणाऱ्या इटलीमधील लहान लहान संस्थानांमधील जुलमी राज्यकर्त्यांचा मोड करण्याचा काहूरनें निश्चय केला. दक्षिण इटलीमध्यें असलेलें नेपल्समधील जुलमी संस्थानिकाचें राज्य मोडून टाकण्याबद्दल काहूरनें गॅरीबाल्डीस प्रोत्सा- हन दिलें. गॅरीबाल्डीनें आपल्या हाताखालील एक हजार राष्ट्रभक्त सैन्यानिशीं १८६० च्या मे महि- न्यांत सिसली बेटांत प्रवेश करून तेथील बोरबोन घराण्याची जुलमी राजसत्ता उलथून पाडली ! सप्टेंबर महिन्याच्या सुमा- रास नेपल्सवर स्वारी करून तेथील राजा पळून जातांक्षणीं गॅरीबाल्डीनें तें संस्थान सार्डिनिया - पिडमाँटच्या संस्थानास जोडल्याचे जाहीर केलें. गॅरीबाल्डीनें हीं दोन जुलमी राजांची संस्थानें उलथून पाडल्याची बातमी - १८६०.