पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८वें.] सार्डिनिया व फ्रान्स यांमध्ये तह - १८५८. इटलीचें एकीकरण. २९३ पराभव करण्यास सार्डिनिया - पिडमांटचें राज्य व इतर इटालियन संस्थानें अगदीच असमर्थ असल्यानें दुसऱ्या कोणत्यातरी राष्ट्राची मदत घेतल्याखेरीज सार्डिनियाला जय मिळणे शक्य नाहीं, असें वाटत असल्यामुळें त्याने १८५८ मध्ये फ्रान्सचा बादशहा लुई नेपोलियन याच्याशीं तह केला. सार्डिनिया व फ्रान्स या राष्ट्रांमधील तह कोणत्या उद्देशानें घडवून आणण्यांत आला हें आस्ट्रियाच्या लक्षांत येतांच, सार्डिनियानें आपलें सैन्य कमी करावें असें आस्ट्रियांकडून फर्माविण्यांत आलें. आस्ट्रियाच्या आज्ञेप्रमाणें आपलें सैन्य कमी करण्याचें सार्डिनियानें नाकारतांच आस्ट्रि- यानें सार्डिनियावर स्वारी केली; व काहूरच्या मनीषेप्रमाणें आस्ट्रियाशीं लवकरच युद्ध उपस्थित झालें ( एप्रील - १८५९ ). अशा रीतीनें आस्ट्रियाशीं युद्ध उपस्थित झाल्यावर १८५८ च्या तहाप्रमाणें फ्रान्सनें सार्डिनियास मदत केली. १८५९ च्या मे महिन्यांत फ्रान्स व सार्डिनिया यांच्या संयुक्त फौजेनें मॅगेन्टा व सॉल- फेरिनो या दोन ठिकाणीं आस्ट्रियन सैन्याचा पुरा आस्ट्रियाशीं युद्ध - मोड करून त्यास लॉबर्डीमधून हांकून लावलें. सार्डिनियानें मिळविलेल्या या जयामुळे सर्व इटलीं भर १८५९. आनंदोत्सव सुरू झाले. नेपोलियनबद्दलही सर्वांस आदर वाटू लागला; व आतां आल्पसू • पर्वत उतरून आस्ट्रियन सैन्याचा पुरा मोड करण्यासाठीं नेपोलियन आस्ट्रियन सैन्यावर छापा घालील असें सर्वांस वाटूं लागलें ! परंतु इटालियन लोकांच्या मनषेिप्रमाणें नेपोलियननें कांहींच कृति केली नाहीं इतकेंच नव्हे तर सार्डिनियाची मुळींच संमति न घेतां शत्रूशीं व्हिला-फँका येथें ११ जुलै रोजीं निमूटपणें तह केला. त्यावेळची इतर परिस्थिति पाहून आस्ट्रियाशीं तह करणें आपल्या राष्ट्रास अधिक श्रेयस्कर आहे असें नेपोलि-" यनला वाटत होतें. इटालियन लोकांच्या आकांक्षेप्रमाणें संयुक्त इटलीचें एक बलाढ्य राष्ट्र स्थापन झाल्यास त्यापासून आपल्या राष्ट्रास धोका येईल,