पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ पॅरीसचा तह - १८५६. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण तह करण्यास कबूल झाला. १८५६ मध्ये पॅरीस शहरीं झालेल्या तहान्वयें रशियाला आपला सेबास्टपूल किल्ला परत मिळाला; परंतु रशियानें टर्कीच्या साम्राज्यांतील कोणत्याही प्रदेशाबद्दल कसलेही हक्क न सांगण्याचें कबूल केलें. काळ्या समुद्रावर कोणत्याही राष्ट्राचें स्वामित्व नसल्याचें ठरलें व तो सर्व राष्ट्रांस खुला असल्याचें ठरून टर्कीींचें स्वातंत्र्य जाहीर करण्यांत आलें ! कीमियाच्या लढाईत भाग घेऊन आपल्या पॅरसि शहरीं या युद्धाचा' तह घडवून आणण्यांत लुई नेपोलियननें फ्रान्स राष्ट्रास पुनरपि श्रेष्ठपदास • चढविलें होतें असें म्हणण्यास पाहिजे. परंतु या युद्धांत हात घालून समाधान न झाल्यामुळें इटलीच्या राजकारणांत हात घालून आपलें. युरोपमधील प्रस्थ बरेंच माजवावें असें नेपोलियनला वाटू लागलें ! व अशाप्रकारची संधि नेपोलियनला १८५८ च्या सुमारास अनायासेंच मिळाली ! १८४८ पासून सार्डिनिया-पिटमाँटचा राजा व्हिक्टर इमान्यूल हाच संयुक्त इटलीचा पुढारी आहे असें इटालियन देशभक्तांस वाटत होतें. परंतु त्याच्या नेतृत्वाखालीं इटलीच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीं कोणते उपाय योजावयाचे याबद्दल इटालियन मुत्सद्यांमध्यें मतभेद असे. परंतु सुदैवानें १८५० च्या सुमारास काहूर नांवाचा एक प्रख्यात मुत्सद्दी त्याच्या मंत्रिमंडळांत येऊन त्याच्या सल्ल्यानें इटालियन लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षा सफल झाल्या. प्रख्यात मुत्सद्दी काहूर याचें असें म्हणणें होतें कीं, इटलींतील लांबडी व व्हेनिस यांवर आपले वर्चस्व स्थापून इटलीमधील इतर जुलमी राजेरजवाड्यांस आपल्या धोरणाप्रमाणें वागावयास लावणाऱ्या आस्ट्रि- याचा, इटलीच्या एकीकरणाच्या मार्गांत अडथळा आहे; व आस्ट्रियाचा,