पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ पें.] इटलीचें एकीकरण. २९१ चालीकडे इंग्लंड व फ्रान्स हीं राष्ट्रें डोळ्यांत तेल घालून पहात होतीं. भूम- ध्यसमुद्रांत रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राचा प्रवेश झाल्यास इंग्लंड व फ्रान्स यांच्या हितसंबंधांस जबरदस्त धोका येण्याचा संभव असल्यामुळें, भूमध्य- समुद्रावर टर्कीचें कमकुवत मोहरें जिवंत ठेवण्याचें फ्रान्स व इंग्लंड या राष्ट्रांनी ठरविलें; व रशियाला मोल्डेव्हिया प्रांतांतून आपलें सैन्य परत नेण्याविषयीं विनंति करण्यांत आली ! परंतु टर्की राजधानी जें कॉन्स्टॅटिनोपल शहर तें हस्तगत करून भूमध्यसमुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करावें अशी राशयाची फार दिवसांपासूनची मह- `त्त्वाकांक्षा असल्यानें, फान्स व इंग्लंड या राष्ट्रांनी केलेल्या सूचनांकडे झार • निकोलसने दुर्लक्ष केलें ! तेव्हां अर्थातच आपल्या हितसंबंधाचें संरक्षण करण्यासाठी इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनीं टर्कीला मदत करण्याचें ठरवून · रशियाविरुद्ध शस्त्र उपसलें ( मार्च १८५४ ). सेबॅस्टपूलचा वेढा- १८५५. १८५४ मधील रशियन मोहिमेचा पराभव झाला. डॅन्यूब नदीच्या आसमंतात् असलेले किल्ले काबीज करण्याचे रशियाचे प्रयत्न फसले जाऊन टर्कीच्या सैन्याकडून त्यांना माघार घ्यावी लागली. १८५४ मध्यें फ्रेंच व इंग्लिश सैन्ये रणांगणावर दाखल होऊन त्यांनी क्रीमियन द्वीपकल्पांतील रशियाच्या ताब्यांत असलेला' सेबास्टपूल नांवाचा भक्कम किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला; परंतु एक वर्षभर रशियन वीरांनीं कांहीं दाद दिली नाहीं व शेवटी मोठ्या शौयीनें एक वर्षभर किल्ला लढवून तो - सरतेशेवटीं शत्रूच्या ताब्यांत द्यावा लागला. हा किल्ला पडल्यावर तर रशियाची अगदींच निराशा झाली; व १८५५ च्या मार्च महिन्यांत झार निकोलस मरण पावून त्याच्यानंतर गादीवर येणाऱ्या दुसऱ्या अलेक्झांडरच्या ( १८५५ - ८१ ) मनांत युद्ध पुढें चालवावयाचें नसल्यामुळे रशिया