पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण अगदीं अनियंत्रित सत्ता न घेतां, लोकनियंत्रित राज्यपद्धतीचा आपण अंगीकार केला आहे हैं दाखविण्यासाठीं राष्ट्रांतील कायदे करण्यासाठीं दोन सभा ( सीनेट व राष्ट्रीय सभा ) स्थापन केल्या; परंतु या सभांच्या • हाती फारच थोडी सत्ता ठेवण्यांत आल्यामुळे या दोन सभा असून नसून - सारख्याच होत्या असें म्हणावयास पाहिजे ! बादशहाचें पद धारण केल्यावर आपल्या चुलत्याप्रमाणे, मोठमोठीं शौर्याचीं कृत्ये करून फ्रेंच लोकांकडून लोकप्रियता संपादन करावी, व युरोपियन राजकारणांत हात घालून आपल्या राष्ट्रास युरोपियन राष्ट्रांमध्ये प्रमुख स्थान प्राप्त करून द्यावें असें त्यास वाटूं लागलें. परराष्ट्रीय राजकार- णांत हात घालण्याची संधि मिळण्यास त्यास फार दिवस वाट पहावी लागली नाहीं ! रशियाचा झार निकोलस हा महत्त्वाकांक्षी असून दक्षिण व पूर्वेकडे आपलें साम्राज्य विस्तृत करून भूमध्यसमुद्र व पॅसिफिक क्रीमियन युद्ध- १८५४ - महासागर यांवर आपलें वर्चस्व प्रस्थापित करावें अशी त्याची मनीषा होती. दक्षिणेकडे आपले वर्चस्व स्थापण्याचा मार्गांत त्यास टर्कीचा अडथळा येणार होता ! तेव्हा आतां टर्कीींचे राष्ट्र आपणास गिळंकृत करावयास सांपडावें या हेतूनें झार निकोलसनें 'टर्कीींचे राष्ट्र आतां वृद्धावस्थेत पोहों- चलें असून फार दिवस जिवंत रहाणें शक्य नाहीं' असा विलक्षण शोध लावून टर्कीच्या साम्राज्याचे आपणच कायते एकटे वारस आहोंत अशी आपली समजूत करून घेतली ! इतकेंही करून टर्कीचें राष्ट्र मृत होईपर्यंत वाट पहाण्या- ची रशियाच्या झारला अवश्यकता न वाटून, झार निकोलसनें टर्कीचा कांहीं प्रांत बळकाविला; व टर्कीच्या साम्राज्यांतील ग्रीक ख्रिश्चन धर्मीय लोकांचे आपण संरक्षक आहोंत हें मान्य करण्यासाठीं टर्कीच्या सुलतानाकडे बोलणें लावलें! झारच्या या अरेरावीपणाचा अर्थातच टर्कीच्या सुलतानानें निषेध केला ! आपल्या न्याय्य (!) मागणीचा निषेध झालेला पाहून रशियानें -मोल्डेव्हिया प्रांतावर स्वारी केली (जून १८५३). रशियाच्या या हाल-