पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. इटलीचें एकीकरण. इ. स. १८६१ मध्यें इटलीचें एकीकरण होऊन संयुक्त इटलीचें राज्यपद सार्डिनिया - पिटमाँडचा राजा व्हिक्टर इमान्यूल यांस देण्यांत आलें ! आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीं इटालियन संस्थानांकडून जे प्रयत्न करण्यांत आले, त्या प्रयत्नांस फ्रान्सचा बादशहा तिसरा नेपो- लियन याची मदत मिळाली नसती, तर आस्ट्रियाच्या मगरमिठींतून इटलीची सुटका करून संयुक्त इटलीचें राज्य स्थापन करणें इटालियन देशभक्तांस अगदींच अशक्य झालें असतें ! तेव्हां इटलीचें एकीकरण होऊन संयुक्त इटलीचें एक संघटित राष्ट्र स्थापन करण्यासाठी कसकसे प्रयत्न करण्यांत आले, हें नीट समजण्यास आपणास फ्रान्सकडे व फ्रान्सचा १८४८ मधील प्रेसिडेंट लुई नेपोलियन याच्या महत्त्वाकांक्षेकडे : लक्ष देणें अत्यावश्यक आहे ! फ्रान्सच्या लोकसत्ताक राज्यावर प्रेसिडेंट म्हणून लुई नेपोलियनची निवडणूक ( १८४८ डिसें. ) झाल्यावर त्याच्याबद्दल केलेलें अखेर खरे ठरलें ! लुई आपल्या चुलत्याप्रमाणेंच फ्रान्समध्यें पुनः राजसत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करील असें सर्वांस वाटत होतें. फ्रान्सच्या अध्यक्षाच्या जागेवर येतांक्षणीं लुई नेपोलियननें इटलीमध्यें सैन्य पाठवून गॅरीबाल्डी व मॅझिनी यांनी रोममध्यें नुकतेच स्थापन केलेलें प्रजासत्ताक राज्य मोडून टाकलें. त्यानंतर फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेत बरीच ढवळा- . ढवळ करून आपल्या हातांत अनियंत्रित सत्ता घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू झाला; व १८५२ मध्ये त्याने मोठ्या थाटानें स्वतः बादशाही किताब धारण केला ! यावेळीं त्यानें आपल्या हातांत लुई नेपोलियन बादशाही पद धारण करतो.