पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. | प्रकरण १७ वें . ] अशाप्रकारें १८४८ मध्यें सर्व युरोपभर क्रान्तिकारक चळवळी उत्पन्न होऊन लोकनियंत्रित राज्यपद्धति स्थापण्याचे प्रयत्न करण्यांत आले; परंतु सरतेशेवटीं ते प्रयत्न निष्फळ ठरून ठिकठिकाणच्या राज्यकर्त्यांनीं आपापल्या देशांवरील राजसत्तेची मगरमिठी अधिकच दृढ केली ! आपले . प्रयत्न निष्कळ झालेले पाहून ठिकठिकाणच्या देशभक्तांची निराशा झाली; तरी त्यांच्या या वेळच्या पराभवांमुळें एक गोष्ट मात्र त्यांच्या चांगली निदर्शनास आली, व ती गोष्ट म्हणजे 'संघटित प्रयत्न व तो प्रयत्न अधिक लवकर सिद्धीस जाण्यासाठीं आपला मनगटाचा जोर साध्य केल्याखेरीजा आपणास यश मिळणार नाहीं' हीच होय !