पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें . ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २८७ प्रशियामधील आपली सत्ता देखील कमकुवत होईल; व याखेरीज आपण या बादशाही पदाचा स्वीकार केल्यास आस्ट्रिया युद्ध करण्यास प्रवृत्त होईल असें वाटून फ्रेडरीकनें बादशाही पदाचा स्वीकार केला नाहीं. झविंग व होल- स्टेन हे प्रांत डेन्मार्कशी अशाप्रकारें संयुक्त जर्मनपार्लमेंटकडून अर्पण करण्यांत आलेल्या पादशाहीपदाचा स्वीकार करण्याचं फेडरीक वुइल्यमकडून नाकारण्यांत आल्यावर या पार्लमेंटची नांवापुरती असलेली सत्ताही संपुष्टांत आली असें म्हणण्यास हरकत नाहीं ! संयुक्त जर्मन पार्लमेंट आपणास मदत करील या आशेवर गरीब बिचाऱ्या श्लेझविग होलस्टेन या प्रांतांतील लोकांनी बंड उभारलें होतें ; परंतु या पार्लमेटचें अस्तित्वच संपुष्टांत आल्यावर या प्रांतांतील लोकांच्या प्रयत्नास कोणीकडूनही सहानुभूति मिळेना ! १८४८ मध्यें प्रशियानें डेन्मार्कशीं तह करून या प्रांतास मदत करण्याचें नाका होतें, तरी देखील डेन्मार्कविरुद्ध या प्रांतांतील लोकांची चळवळ थांबली नव्हती. १८४९ मध्ये प्रशियानें पुनः या प्रांताच्या वतीनें डेन्मार्कशीं युद्ध सुरू केलें ! तेव्हां या दोन प्रांतांसंबंधी काय तो कायमचा निकाल करून टाकण्यासाठी इंग्लंड व रशिया या दोन राष्ट्रांस मध्यस्ती करावी लागली. १८५० मध्यें सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठीं लंडन शहरीं एक सर्वराष्ट्रांची परिषद भरून, हे दोन प्रांत डेन्मार्कच्या राज्याशीं कायमचे जखडून टाकण्याचें ठरलें ! फ्रँकफोट येथें स्थापन झालेल्या संयुक्त जर्मन पार्लमेंटकडून आपणास मदत मिळेल या आशेवर विश्वास ठेवल्यामुळे या दोन प्रांतांवरील पारतंत्र्याचें जोखड अधिकच कायम झालें ! ! पण, पुनः योग्य संधि सांपडल्यास आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याची संधि तेथील लोक मोठ्या उत्कंठेनें पाहूं लागले !! जखडून टाकण्यांत येतात- १८५०.