पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण सैन्यास शरण गेल्यावांचून गत्यंतरच नव्हतें ( ऑगस्ट १८४९ ). अशा प्रकारें हंगेरीतील मॅगेआर या स्वाभिमानी लोकांस पुनरपि आस्ट्रियाचं जूं आपल्या मानेवर निमूटपणें घेणें भाग पडलें ! श्लेझविग व होलस्टेनच्या प्रकरणांत प्रशिया सारख्या बलाढ्य संस्थानास आपल्या हुकमतीखालीं वागावयास लावण्यास. फ्रँकफोर्ट येथें भरलेलें संयुक्त जर्मनीचें पार्लमेंट कसें असमर्थ होतें हैं आपण पाहिलेंचं आहे. व्हिएन्ना व बर्लिन येथें १८४८ च्या सुमारास क्रान्तिकारक चळवळी सुरू होत्या तरी प्रशियानें या पार्लमेंटची सत्ता धाब्यावर बसविण्यास मागें- पुढें पाहिलें नाहीं, तर आतां क्रान्तिकारक चळवळींचा पूर्ण बीमोड झाल्या- वर प्रशिया किंवा इतर जर्मन संस्थानें या पार्लमेंटची सत्ता कितपत मान्य करतील हें तर स्पष्टच दिसत होतें ! अशाप्रकारें या संयुक्त पार्लमेंटची दुर्बलता व्यक्त झाली होती तरी सर्व जर्मनीचें एकीकरण करण्याची आशा या संयुक्त पार्लमेंटनें कांहीं सोडली नाहीं ! १८४८ च्या डिसेंबर महिन्याच्या सुमारास या पार्लमेंटनें सर्व जर्मन संस्थानांचें राष्ट्रीय एकीकरण करण्याच्या इराद्यानें एक घटना तयार केली, व आतां फक्त या संयुक्त जर्मन राष्ट्राचें बादशाही पद कोणास द्यावयाचे हाच प्रश्न या पार्लमेंट सभेपुढें होता ! जर्मनींतील आस्ट्रिया किंवा प्रशिया या दोन बलाढ्य संस्थानांपैकीं कोणास तरी हा मान मिळावयाचा होता ! फ्रँकफोर्ट येथें असलेल्या जर्मन पार्लमेंटमध्यें बादशहाचें पद कोणास द्यावयाचें यासंबंधानें मोठा कडाक्याचा वादविवाद होऊन, नानाविध जातींनीं मिश्र असलेल्या आस्ट्रिया- पेक्षां प्रशियामध्येच जर्मन लोकांचा भरणा अधिक आहे म्हणून प्रशियाच्या राजासच जर्मनीचें बादशाही पद अर्पण करण्याचा ठराव पास झाला. या ठरावाप्रमाणें हें बादशाही पद अर्पण करण्यासाठीं पार्लमेंटसभेतर्फे एक शिष्टमंडळ जेव्हां प्रशियाचा राजा ३ रा वुइल्यम याजकडे आलें तेव्हां फ्रेडरीक वुइल्यमनें दूरवर विचार करून हैं बादशाही पद स्वीकारण्याचें नाकारलें ! फ्रँकफोर्ट येथें असलेल्या लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या पुर- स्कर्त्यांकडून मिळत असलेलें हें बादशाही पद स्वीकारलें तर हलके हलके