पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें . ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २८५ कांहीं नष्ट करतां आला नाहीं. १८४८ मध्ये कॉशूट नांवाचा पुढाऱ्याच्या नेतृत्वाखालीं हंगेरियन लोकांनीं आपल्या राष्ट्रास हंगेरीमधील चळ- आस्ट्रियन साम्राज्याच्या इतर राष्ट्रांशी जखडून न टाकतां स्वराज्याचे हक्क देण्याविषयीं आस्ट्रि- वळ - १८४८. यांच्या बादशहाकडे मागणी केली, परंतु बादशहाकडून त्यांची मागणी फेंटाळून लावण्यांत आल्यावर हंगेरियन लोकांनीं बुडापेस्ट येथें बंड उभा- रलें ! बुडापेस्ट येथील बंडाचा बीमोड करण्यासाठीं आस्ट्रियन बादशहानें एक लक्ष सैन्य तत्काळ रवाना केलें. रशियाच्या मदतीनें या वेळीं कॉशूटच्या नेतृत्वाखालीं असलेल्या हंगेरियन सैन्यानें कल्पनातीत कामगिरी बजाविली होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. आस्ट्रि याच्या नांवाजलेल्या सैन्याशी लढून हंगेरियन सैन्यानें आस्ट्रियन सैन्याचा पूर्ण पराभव केला होता, व आतां हंगेरियन लोकांच्या आकांक्षेप्रमाणे त्यांना पूर्णपणें स्वराज्याचे हक्क आस्ट्रियन बादशहाकडून मिळतील असें वाटूं लागलें होतें; परंतु या वेळीं हंगेरियन लोकांचा पुढारी कॉशूट यानें मोठी चूक करून धिमेपणें स्वराज्य प्राप्त करून घेण्याची संधि व्यर्थ दवडली असें म्हणावयास पाहिजे. आस्ट्रियन सैन्यावर आपण मिळविलेल्या जयानें चढून जाऊन कॉशूटनें लागलीच हंगेरीचें स्वातंत्र्य जाहीर केलें ( १८४९ एप्रील ). हंगेरीनें आस्ट्रियाविरुद्ध केलेलें बंड यशस्वी ठरून हंगेरियन लोकांनीं आपलें स्वातंत्र्य जाहीर केलेलें पाहतांच रशियाचा बादशहा निकोलस यास धास्ती पडली ! आपण यावेळीं आस्ट्रियास मदत केली नाहीं, तर ही चळवळींची लाट हंगेरीस लागून असलेल्या आपल्या साम्राज्यांत पसरून, आपले लोकही बंडाळी करतील असें वाटून निकोलसनें आस्ट्रियास मदत करण्याचे ठरविलें. रशियाकडून मदत मिळतांच आस्ट्रियास जोर आला; व पश्चिमेकडून आस्ट्रियन सैन्य व पूर्वेकडून रशियन सैन्य यांच्यामध्यें हंगेरियन सैन्य कोंडले गेल्यानें त्या हंगेरीमधील बंडाळी मोडण्यांत येते- १८४९.