पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण मध्यें नेपोलियनच्या फ्रेंच सैन्यानें, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांच्या नेतृत्वा- खालीं असलेल्या इटालियन सैन्याचा पराभव करून त्या सैन्यास रोममधून हांकून लावलें, व पोपला पुनः रोममधील गादीवर प्रस्थापित केलें. इटलीमधील क्रान्तिकारक चळवळींचा अशा प्रकारें प्रतिकार चालला असतां आस्ट्रियाच्या विरुखळित साम्राज्यांत बंडाळी सुरू झाली. आस्ट्रियाचें साम्राज्य म्हणजे अठरा धान्यांचे कडबोळें होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. आस्ट्रियाची राजधानी जी व्हिएन्ना, तेथील जर्मन जनतेनें आस्ट्रियन साम्राज्यां- तील बंडाळी. बंडाळी सुरू करतांच या विस्खळित साम्राज्यांतील इतर लोकांनी देखील जर्मन लोकांचेंच अनुकरण करण्याचा उपक्रम सुरू केला. व्हिएन्ना शहरीं जर्मन लोकांनी बंड उभारून कांहीं दिवस झाले नाहींत तोंच, प्रेग शहरांत स्लाव्ह लोकांनीं, बुडापेस्ट शहरांत हंगेरियन लोकांनीं व मिलन व व्हेनिस येथें इटालियन लोकांनी आस्ट्रियाविरुद्ध एकसमयावच्छेदेंकरून बंड उभारलें ! तेव्हां आतां आस्ट्रियन साम्राज्यांतील; जर्मन, स्लाव्ह, हंगेरियन व इटालियन लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी ही बंडाळी सुरू केल्यामुळें आस्ट्रियन साम्राज्याचीं चार शकलें तात्काळ होतील असें वाटूं लागलें ! परंतु आस्ट्रियन सैन्य जय्यत तयार असल्यामुळे आस्ट्रियाच्या बादशहास हें अठरा धान्यांचें कडबोळें तसेंच आपल्या मगरमिठींत राखतां आलें ! सैन्याच्या मदतीनें प्रेगमधील स्लाव्ह लोकांची, व्हिएन्नामधील जर्मन लोकांची व व्हेनिसमधील इटालियन लोकांची बंडाळी तत्काळ मोडून टाकण्यांत आली ! परंतु हंगेरींतील बंडाळी मोडून टाकण्याच्या काम मात्र आस्ट्रियास बराच त्रास पडला ! हंगेरीचें राज्य आजपर्यंत बरींच शतकें आस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग घराण्याच्या ताब्यांत होतें, तरी त्यास हंगेरियन लोकांचा स्वाभिमान