पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें . ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २८३ १८४८ मध्ये ९वा पायस नांवाचा पोप रोमच्या संस्थानावर अधिष्ठित होता. पायसनें आपल्या कारकीर्दीत पुष्कळ चांगल्या सुधारणा करून लोकप्रियता संपादन केली होती. त्यानें आपल्या संस्थानांतील जन- तेस राज्यकारभाराचे बरेच हक्कही दिलेले होते. परंतु १८४८ च्या सुमा- रास व्हेनिस, मिलन व सार्डिनिया वगैरे संस्थानांनी आस्ट्रियाविरुद्ध उभारलेल्या बंडास पोपनें मदत करावी, असा रोममधील जनता पोपला आग्रह करूं लागतांच तसें करणे इष्ट नव्हे, असें पोपला वाटूं लागलें. ख्रिश्चन धर्माचे आपण मुख्या- ध्यापक असतां एका ख्रिश्चन राष्ट्राविरुद्ध दुसऱ्या पोपची चमत्कारिक परिस्थिति. ख्रिश्चन राष्ट्रांस मदत करणें बरें नव्हे असें पोप प्रतिपादन करूं लागला ! परंतु पोपची ही विचारसरणी रोममधील जनतेस मुळींच पटली नाहीं ! इटलीमधील पोप संयुक्त इटलीच्या राष्ट्रीय युद्धास मदत करत नाहीं, हें पाहून रोममधील जनतेस पोपबद्दल तिटकारा व तिरस्कार वाहूं लागला; व पोपला आपल्या गादीवरून पदच्युत करण्याचे प्रयत्न रोममधील जनते- कडून उघड उघड सुरू करण्यांत आले. तेव्हां आपल्या जनतेचें हें कृत्य पाहून घाबरून जाऊन पोपनें नेपल्समध्यें पळ काढला ( २४ नोव्हेंबर १८४८). रोम शहरांतून पोपनें पळ काढतांच रोमचें संस्थान क्रान्तिकारक पक्षाचा पुढारी मॅझिनी याच्या ताब्यांत आलें व त्यानें लागलींच रोमशहरीं लोकसत्ताक राज्य स्थापन झाल्याचें जाहीर केलें. मॅझिनीच्या या कृत्याचा सर्व युरोपभर गवगवा झाला. ख्रिश्चन लोकांच्या धर्मगुरूस मॅझिनीनें रोम शहरांतून हांकून लावलेलें पाहून रोमन कॅथलीक पंथाचे राजेरजवाडे व लोक खवळून गेले ! फ्रान्समधील रोमन कॅथलीक धर्माच्या जनतेस व सर्व युरोपियन राजेरजवाड्यांस खूष करण्याची ही चांगली संधि आहे असें वाटून, फ्रान्सच्या लोकसत्ताक ' राज्याचा अध्यक्ष नेपोलियन यानें पोपचा पक्ष उचलला व मॅझिनीच्या सैन्यास रोम शहरांतून हांकून लावण्यासाठीं फ्रेंच सैन्य रवाना केलें. १८४९.