पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण. इटालियन सैन्याचा मोड झाला व आस्ट्रियन सैन्य पुनः मलिनमध्यें शिरलें ! आपणास पराभव खावा लागल्यामुळे कष्टी होऊन चार्लसनें राज्यपदाचा त्याग केलां, व त्याच्यानंतर त्याचा मुलगा व्हिक्टर २ रा इमॅन्यूल १८४९ च्या मार्चमध्यें सार्डिनियाच्या गादीवर आला ! त्यावेळची एकंदर परिस्थिति पाहून आस्ट्रियाविरुद्ध जय मिळविणें सध्यां तरी अशक्य आहे हें कळून येतांच व्हिक्टर इमॅन्यूलनें आस्ट्रियाशीं तहाचें बोलणें लावलें. या वेळीं आस्ट्रियाला आपल्या साम्राज्यांतील इतर प्रांतांतील चळवळीकडे सार्डिनिया व आस्ट्रिया लक्ष देणे अत्यावश्यक असल्यानें, व्हिक्टर यांमधील तह मार्च- इमॅन्यूलकडून आलेल्या तहाच्या बोलण्यास १८४९. मान्यता दर्शवावी लागली. या तहाच्या कलमान्वयें सार्डिनिया व पिढमांट या संस्थानांचा राजा इमॅन्यूल यास आस्ट्रियाला बरीच खंडणी मात्र द्यावी लागली ! सार्डिनिया - पिडमांटच्या राजाचा पराभव करून आस्ट्रियानें पुनरपि लाँबर्डी व व्हेनिस या दोन संस्थानांवर आपली सत्ता बसविली ! इटलींतील क्रान्तिकारक चळवळीचा अशा रीतीनें शेवट होऊन पुनरपि इटलीवर · आस्ट्रियाचें वर्चस्व स्थापलें गेलें ! परंतु इटालियन लोकांच्या स्वराज्य- प्राप्तीचा पहिला प्रयत्न फसल्यानें एका गोष्टीबद्दल मात्र सर्वांच्या मनांत जाणीव उत्पन्न झाली; व ती गोष्ट म्हणजे 'इटलींतील सर्व संस्थानांनी एक- जुटीनें व एकसमयावच्छेदे करून जर इटलीच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न केला, तरच तो प्रयत्न सिद्धीस जाण्याची कांहीं आशा आहे ' हीच ती जाणीव होय ! व्हेनिस व मीलन येथील क्रान्तिकारक चळवळ ज्याप्रमाणें आस्ट्रि- न बादशहाकडून चेपून टाकण्यांत आली; तद्वतच टस्कनी, नेपल्स येथील क्रान्तिकारक चळवळी देखील तेथील प्रतिगामी धोरणाच्या राज्यकर्त्यांकडून मोडून टाकण्यांत आल्या ! परंतु रोममधील चळवळ कांहीं सहज रीतीनें चेपून टाकतां आली नाहीं.