पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें . ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २८१ इटलीमधील संस्थानें आस्ट्रिया विरुद्ध बंड उभारतात. येतांच, आस्ट्रियाच्या जुलमी अंमलाखालीं असलेल्या व्हेनिस व मिलन या दोन इटालियन संस्थानांनीं एकदम आपलें स्वातंत्र्य जाहीर करून आपल्या संस्थानांत अस- लेल्या आस्ट्रियन सैन्यास हाकून लावलें. अंशा प्रकारचा दिग्विजय केल्यावर इटलीमधील आस्ट्रि- याचें वर्चस्व समूळ नष्ट करण्याच्या कामी आपणास मदत करावी, अशी या दोन छोट्या संस्थानांनीं इटलीमधील इतर संस्थानांस व सार्डिनियाचा राजा चार्लस आल्बर्ट यास विनंति केली. या वेळीं व्हेनिस व मिलन प्रमाणेंच क्रांतिकारक चळवळींची लाट इटलीमधील सर्व संस्थानांत पस- रली असल्यामुळे टस्कनी, रोम, सिसली व इतर इटालियन संस्थानांतील जनतेकडून, व्हेनिस व मिलन या दोन संस्थानांनीं सुरू केलेल्या स्वातंत्र्य- प्राप्तीच्या प्रयत्नास पाठिंबा मिळाला व आस्ट्रियाशीं टक्कर देण्यासाठीं इटालियन संस्थानांतील फौजा व्हेनिस व मिलन या संस्थानांच्या मदतीस धांवून गेल्या ! इटालियन द्वीपकल्पाची आस्ट्रियाच्या मगरमिठींतून सुटका व्हावी या हेतूनें आस्ट्रियाशीं दोन हात करण्यास उद्युक्त झालेल्या संयुक्त इटा- लियन सैन्याचें आधिपत्य सार्डिनियाचा राजा चार्लस आल्बर्ट यास देण्यांत आलें होतें. चार्लस आल्बर्टचें घराणें फार प्राचीन असून आज किती तरी शतकें इटलीमध्यें मोडणाऱ्या सार्डिनिया बेटावर या घराण्यानें राज्य केलें होतें. चार्लस आल्बर्टनें आपल्या संस्थानांतील जनतेस राज्यकारभारांत बराच भाग दिला असून, इटालियन लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षेबद्दल सहा- नुभूति दर्शविली असल्यानें, सर्व इटालियन देशभक्तांस चार्लस आल्बर्ट व त्याचें घराणें यांबद्दल आपलेपणा वाटावा यांत नवल नाहीं ! संयुक्त इटालियन सैन्याचें आधिपत्य स्वीकारून आस्ट्रियन सैन्याशी दोन हात करण्यासाठीं चार्लस आल्बर्ट कूच करीत असतां कस्टोझा शहरा- नजीक ता. २६ जुलै रोजीं आस्ट्रियन सैन्याशीं गांठ पडून त्यांत दुर्दैवें १८