पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण सान होऊन जर्मनीमधील आपले वर्चस्व बरेंच कमी होईल असे वाटून प्रशियाच्या राजास डेन्मार्कशीं तह करणेंच इष्ट वाटलें व फ्रँकफोर्ट येथील जर्मन पार्लमेंटचा मुळींच विचार न घेतां प्रशियानें १८४८ च्या ऑगस्टमध्यें डेन्मार्कच्या राजाशीं वेगळा तह केला प्रशिया, डेन्मार्कशीं तह करितो - १८४८ ऑगस्ट. व श्लेझविंग व होलस्टेन हे दोन प्रांत डेन्मार्कच्या ताब्यांत देण्याचें कबूल केलें ! प्रशियाच्या राजाचें हें उद्दामपणाचे कृत्य पाहून ' जर्मन राष्ट्रीय पार्लमेंट ' मधील सभासदांस अर्थातच राग आला; व प्रशियाच्या या कृत्याबद्दल त्यास योग्य शिक्षा देण्यांत येणें इष्ट आहे असें सर्व सभासदांस वाटूं लागलें. परंतु शांतपणे विचार केल्यावर प्रशि- प्रशियाच्या कृत्यास यास योग्य शिक्षा करण्यास फँकफोर्ट येथील पार्लमेंटकडून नाइलाजा- पार्लमेंट अगदीच असमर्थ आहे हें सर्वोच् स्तव संमति मिळते. लक्षांत आलें, व शेवटीं नाइलाजास्तव या पार्ल- मेंटकडून एक ठराव पास करण्यांत येऊन प्रशियाच्या कृत्यास अनुमति दर्शविण्यांत आली ! पार्लमेंटच्या या कृत्यानें, 'राष्ट्रीय जर्मन पार्लमेंट' ची दुर्बलता मात्र सर्वांच्या निदर्शनास येऊन जर्मनीमधील संस्थानांनी या पार्लमेंटची नांवापुरती असलेली सत्ताही झुगारून दिली ! १८४८ मध्ये सर्व युरोपभर चालेल्या क्रान्तिकारक चळवळी पाहून इटलीमधील लहान लहान संस्थानांतील जनतेस आपल्या मानेवर अस-- लेलें पारतंत्र्याचें जूं फेंकून देण्याची ईर्षा उत्पन्न झाली ! आस्ट्रियाची राज- धानी व्हिएन्ना येथील लोक राज्यकारभारांत लोकमताचा शिरकाव व्हावा म्हणून आपल्या बादशहाविरुद्ध चळवळ करीत आहेत अशी बातमी