पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें. ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २७९ वंशांतील वारसासच राज्यपद देण्यांत यावें, असा जर्मन कायदा असल्या- मुळे, श्लेझविग व होलस्टेन या दोन प्रांतांतील लोकांनीं, डेन्मार्कच्या . कायद्याप्रमाणें राज्यपद कोणास मिळावें यासंबंधीं केलेली व्यवस्था आपणास मान्य नसल्याचें प्रदर्शित केलें ! इलेझविंग व होलस्टेन या दोन प्रांतांतील जर्मन जनतेचें वरील प्रकारचें मत पाहून, डेन्मार्कच्या राज्यांत व या दोन प्रांतांत पुढें कांहीं वितुष्ट येऊं नये म्हणून डेन्मार्कच्या राजानें १८४६ च्या सुमारास एक जाहीरनामा प्रसिद्ध करून वारसाहक्कासंबंधीं डेन्मार्कचेच नियम या दोन प्रांतांसही लागू असल्याचें जाहीर केलें. या जाहीरनाम्याविरुद्ध इलेझविग व होलस्टेन या दोन प्रांतांतील लोकमत बरेंच क्षुब्ध झालें व तेथील जनतेनें १८४८ मध्ये सर्व युरोपभर चाललेल्या क्रांतिकारक चळवळींचा फायदा घेऊन डेन्मार्कच्या राजाविरुद्ध बंड उभारलें इतकेंच नव्हे तर कफोर्ट येथें नुकत्याच स्थापन झालेल्या जर्मन राष्ट्रीय पार्लमेंटकडे आपणास मदत करण्याविषयीं विनंति केली. आपल्या जर्मन बांधवांच्या -या हांकेकडे फ्रँकफोर्ट येथें भरलेल्या जर्मन राष्ट्रीय पार्लमेंटला अर्थातच दुर्लक्ष्य करितां येईना ! या दोन प्रांतांतील लोकांच्या विनंतीचा जर्म पार्लमेंटकडून विचार करण्यांत येऊन, श्लेझविंग व होलस्टेन दोन प्रांतांस डेन्मार्कच्या मगरमिठींतून सोडविण्याची कामगिरी प्रशिया व उत्तरेकडील कांहीं जर्मन संस्थाने यांच्यावर सोपविण्यांत आली ! यावेळीं प्रशियानें कसलीच नाखुषी न दर्शवितां जर्मन पार्लमेंटच्या इच्छेप्रमाणें ही कामगिरी मोठ्या आनंदानें पतकरली व डेन्स लोकांचा पराभव केला. तेव्हां डेन्स लोकांनी चवताळून जाऊन प्रशियावर सूड घेण्यासाठीं बाल्टिक- समुद्रांत असलेल्या प्रशियन आरमाराचा विध्वंस करून टाकला. आपल्या आरमाराचा विध्वंस झालेला पाहून आतां काय करावें असा प्रशियास विचार पडला ! डेन्मार्कशीं असलेलें युद्ध पुढे चालविल्यास आपलें नुक-