पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण 'व्हावें' अशी प्रत्येक सभासदाची मनापासूनची इच्छा होती ! परंतु आपलें इष्ट कार्य त्वरित घडवून आणण्यास नुसती इच्छा किंवा उत्साह असून भागत नाहीं, तर तें कार्य घडवून आणण्यास सरतेशेवटीं शारीरिक जर्मन पार्लमेंटचें दुर्बलत्व. सामर्थ्यावरच अवलंबून रहावें लागतें हें जर्मन लोकपक्षीय पुढाऱ्यांच्या नीट लक्षांत आलें नाहींसें दिसतें ! फ्रँकफोर्ट येथें भरविण्यांत आलेल्या संयुक्त जर्मन पार्लमेंटच्या मार्गांत, जर्मनींतील आस्ट्रिया व प्रशिया या दोन प्रति- -गामी धोरणाच्या बलाढ्य संस्थानांकडून कांहींच अडथळे न आल्यामुळें, - संयुक्त जर्मन राष्ट्र स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा लवकर सफल होई- -लसें जर्मन राष्ट्राभिमानी पुरुषांस वाटूं लागलें; परंतु आस्ट्रिया किंवा प्रशिया यांपैकीं एखाद्या संस्थानानें फ्रँकफोर्ट येथें असलेल्या जर्मन पार्ल- -मेंटच्या सल्ल्याप्रमाणें वागण्याचें नाकरल्यास, त्या संस्थानास आपल्या _इच्छेप्रमाणें वागावयास लावण्याचें सामर्थ्य कांहीं जर्मन पार्लमेंटच्या हातीं -नव्हतें ! व अशाप्रकारचें सामर्थ्य नसल्यामुळे फ्रँकफोर्ट येथील पार्लमेंट असून नसून सारखेंच होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! तें कसें तें - खालील प्रसंगावरून विशद होईल. इलेझविंग व होलस्टेन हे दोन प्रांत जटलंड द्वीपकल्पाच्या दक्षिण भागांत मोडत असून, तेथील लोकवस्ती मुख्यत्वेंकरून जर्मन लोकांचीच • आहे ! १८४८ च्या सुमारास हे दोन प्रांत डेन्मार्कच्या राजाच्या ताब्यांत असून, त्यानें तेथील जनतेस जर्मन कायद्याप्रमाणें व रीतिरिवाजाप्रमाणें श्लेझविंग व होल- *स्टेन यांसंबंधी प्रश्न. राहण्याची मुभा दिलेली होती ! १८४४ च्या सुमारास, डेन्मार्कच्या राजास पुत्रसंतान नसल्या- मुळें डेन्मार्कच्या राजघराण्यांतील पुरुषवंश संपुष्टां- -त येऊन डेन्मार्कच्या कायद्याप्रमाणें, डेन्मार्कचें *वरील दोन्ही प्रांत स्त्रीवारसाकडे जाणार असा रंग ज्येष्ठ घराण्यांतील पुरुषवंश संपुत्रांत आल्यास कनिष्ठ राज्य व त्याबरोबर दिसूं लागला ! परंतु घराण्यांतील पुरुष-