पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २७७ १७ व. ] जर्मनी व इटली या दोन देशांतील कवि व लेखक यांच्या प्रेरणेनें जन- तेच्या मनांत लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या कल्पना प्रादुर्भूत होऊन, संधि सांपडल्यास आपल्या मनांतील विचाराप्रमाणें कृति घडवून आणण्या- ची लोकांच्या मनाची तयारी झाली होती. तेव्हां १८४८ मध्यें पॅरीस शहरीं झालेली राज्यक्रान्ति पाहून जर्मनी व इटली येथील लोकांसही तशाच प्रकारची क्रान्ति आपापल्या देशांत घडवून आणण्याविष प्रेरणा झाल्यास नवल नाहीं ! १८४८ च्या मार्च महिन्याच्या सुमारास क्रान्तिकारक चळवळीचीं लाट जर्मनीमध्यें पसरून, जर्मनींतील इतर लहान लहान संस्थानांप्रमाणेच, आस्ट्रिया व प्रशिया या दोन प्रतिगामी धोरणाच्या संस्थानांतील जनतेनेंही चळवळ करून आपापल्या संस्थानांत अनियंत्रित राज्यपद्धति नष्ट करून, लोकनियंत्रित राज्यपद्धतीचे बरेच हक्क मिळविले. व्हिएन्ना व बर्लिन येथील प्रतिगामी धोरणाच्या राज्यकर्त्यांनीं आपल्या जनतेस राज्यकारभारांत भाग घेण्याचे कांहीँ हक्क दिलेले पाहून, संयुक्त जर्मनीचें एक संघटित राष्ट्र स्थापन झाल्यास फार इष्ट होईल असें जर्मनीमधील कांहीं राष्ट्रा- भिमानी पुरुषांस वाटूं लागलें; व ती इष्ट गोष्ट साध्य करून घेण्याची पूर्वतयारी म्हणून सर्व जर्मन संस्थानांतील लोकपक्षीय प्रतिनिधींचें एक संयुक्त पार्लमेंट स्थापन करण्याची अवश्यकता त्यांना वाटू लागली. जर्मन लोकपक्षीय पुढाऱ्यांच्या प्रेरणेनें अशाप्रकारचें पार्लमेंट १८४८ च्या मे महिन्यांत फ्रँकफोर्ट येथे भरविण्यांत आलें. जर्मन भाषा बोलणाऱ्या प्रत्येक पुरुषास, या पार्लमेंटमधील सभासदाच्या निवडणुकीसंबंधानें मत देण्याचा अधिकार देण्यांत आला होता. १८४८ मध्ये अशा रीतीनें फ्रँकफोर्ट येथें स्थापन झालेल्या पार्लमेंटमध्यें, जर्मनींतील " सर्व जर्मन फ्रँकफोर्ट येथें जर्मन पार्लमेंटची स्थापना - मे १८४८. नांवाजलेल्या लोकपक्षीय पुढाऱ्यांचा भरणा झाला असून, संस्थानांचें एकीकरण करून संयुक्त जर्मनीचें एक संघटित राष्ट्र स्थापन: