पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ लुई नेपोलियन फ्रान्सच्या लोकसत्ताक राज्याचा अध्यक्ष होतो. - १८४८. युरोपचा अर्वाचीन इतिहास. प्रकरण समाजसत्तावादी पक्षानें केलेल्या बंडाचा बीमोड 'कॅव्हेगनॅक' नांवाच्या पुढाऱ्यानें केला असल्यामुळे सर्वांच्या वतीनें त्यासच फ्रान्सच्या प्रजासत्ताक राज्याच्या अध्यक्षाचा मान मिळणार असें सर्वास वाटत होतें, परंतु फ्रान्स- मधील जनतेकडून मतें मागविण्यांत आल्यावर, फ्रान्सचा जगविख्यात बादशहा नेपोलियन बोना- पार्ट, याचा पुतण्या लुई नेपोलियन यासच अधिक मतें मिळाली असल्याचे आढळून आलें ! तेव्हां सर्वानुमतें फ्रान्सच्या प्रजासत्ताक राज्यावर त्याची नेमणूक झाली ! लुईस फ्रेंच जनतेकडून हा जो मान मिळाला होता, तो त्याच्या स्वतःच्या कर्तब- गारीनें मिळाला नसून, बादशहा नेपोलियन बोनापार्ट याच्याबद्दल फ्रेंच जनतेस वाटत असलेला आदरभाव नष्ट झाला नसल्यामुळेंच मिळाला हाता असें म्हणण्यास हरकत नाहीं ! लई नेपोलियनला आतां फ्रान्सचें अध्यक्षपद मिळालें होतें व सर्व सत्ता त्याच्या हातांत आल्यामुळे लुई आपलें अध्यक्षपद झुगारून देऊन योग्य संधि सांपडतांच बादशाही पद स्वीकारतो कीं काय हेंच आतां पहावयाचें होतें ! १८३० मध्यें सर्व युरोपियन राष्ट्रांतून राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी करण्यांत आल्या होत्या, तरी त्यावेळेस ही चळ- -वळीची लाट जर्मनी व इटली या दोन विस्खळित असलेल्या देशांमध्यें पसरली नसून, येथील जनतेनें राज्यकर्त्यांची अनियंत्रित सत्ता निमूटपणें मान्य केली होती ! १८२२ सालीं नेपल्समधील चळवळ आस्ट्रियन सैन्यानें चेंपून टाकल्याचें उदाहरण इटलीपुढें असल्यानें इटलीमध्यें कांहींच गडबड झाली नाहीं; त्याप्रमाणें जर्मनींतील अस्ट्रिया व प्रशिया या प्रमुख व बलाढ्य संस्थानांतील जनतेस आज कितीतरी वर्षे अनियंत्रित राज्यपद्धतीच्या अमलाखालीं राहण्याची संवय असल्यामुळे १८३० च्या सुमारास इतर युरोपियन राष्ट्रांचें उदाहरण पाहून या दोन संस्थांतील जनतेस चळवळ करण्याची स्फूर्ति झाली नसल्यास कांहींच नवल नव्हतें. १८३० नंतर