पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २७५. मुळे, समाजसत्तावादी पक्षानें सुचविलेल्या, व व्यवहाराच्या कसोटीस न उतरणाऱ्या योजना या पक्षास न आवडून, सुव्यवस्थित अशी राज्य- घटना लोकसत्तावादी पक्षास स्वस्थपणे करतां आली. सैन्याच्या मदतीने कांहीं चळवळ्या लोकांस तुरुंगांत टाकण्यांत येऊन, समाजसत्तावादी लोकांच्या प्रेरणेनें स्थापन करण्यांत आलेले राष्ट्रीय कारखाने बंद कर -- ण्यांत आले ! आपण राष्ट्रांत घडवून आणलेल्या महत्त्वाच्या सुधारणा नामशेष करण्याचा प्रयत्न लोकसत्ताक पक्षांतील पुढारी राष्ट्रीय मंडळांत आपलें. मताधिक्य स्थापन करून करीत आहेत हें पाहून समाजसत्तावादी पुढा- यांची तळव्याची आग मस्तकास जाऊन पोहोंचली ! आतां तडजोडीनें या प्रश्नाचा निकाल लागत नाहीं हें पाहून समाजसत्तावादी पुढाऱ्यांनी . हातघाईचा प्रसंग आणला ! तीन दिवसपर्यंत पॅरिसमधील रस्त्यावर दोन्ही पक्षांच्या झटापटी होऊन रक्ताचा पूर वाहूं लागला ! अवघ्या तीन दिवसांत दहा हजार माणसें मृत्युमुखी पडलीं ! सरतेशेवटीं या झटापटीत समाज-- सत्तावादी पक्षाचा पूर्ण पाडाव होऊन लोकसत्तावादी पक्षाचा विजय झाला!' समाजसत्तावादी पक्षाचें हें बंड मोडण्यांत आल्यावर लोकसत्ताक राज्यपद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या 'राष्ट्रीयमंडळा'ने फ्रान्सची एक नवीन राज्यघटना तयार केली. 'राष्ट्रांतील कायदे करण्यासाठीं एकच सभा असावी, राष्ट्रांतील प्रत्येक इसमास निवडणुकीच्या वेळीं मत देण्याचा अधिकार असावा, अंमल- बजावणीच्या खात्यावर एक अध्यक्ष लोकांकडून निवडण्यांत येऊन त्याचा अधिकार चार वर्षे फ्रान्समधील लोक- नियंत्रित राज्यपद्धतीची घटना - १८४८. टिकावा' अशाप्रकारची ही नवीन घटना होती. 'राष्ट्रीय मंडळा'कडून अशाप्रकारची घटना तयार करण्यांत आल्या- वर, या नवीन लोकसत्ताक राज्याचा अध्यक्ष निवडण्यासाठीं, ता. १० डिसेंबर १८४८ रोजीं मतें मागविण्यांत आली. थोड्याच दिवसांपूर्वी