पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरणा करून टाकण्यांत आलीं, व ड्युलरीज राजवाड्याभोंवताली सशस्त्र लोकांचा गराडा पडला ! तेव्हां आतां इतःपर फ्रान्समध्यें राहिल्यास आपलाच प्राण जावयाचा असें वाटून २४ फेब्रुवारी १८४८ मध्यें लुई फिलिपीनें लुई फिलिपी फ्रान्स- मधून पळ काढतो २४ फेब्रु. १८४८. फ्रान्समधन पळ काढला. यावेळी फ्रेंच पार्लमेंटमधील सभासदांनीं धैर्य दाखविलें असतें, तर फ्रान्समधील राजसत्ता नष्ट झाली नसती असें म्हणण्यास हरकत नाहीं.. लुईच्या ऐवजीं त्याच्या नातवास फ्रान्सच्या गादीवर बसवितां आलें असतें. परंतु दंगेखोर मंडळींनीं फ्रान्सच्या पार्लमेंटगृहावर हल्ला करून सभागृहांत प्रवेश करितां क्षणीं सभासदांनीं यत्किंचितही चिकाटी न दाखवितां तेथून पळ काढला ! तेव्हां दंगेखोर मंडळीचा पुढारी लॅमर-- टाईन याने लागलीच फ्रेंच राष्ट्र लोकसत्ताक झाल्याचें जाहीर केलें. अशा रीतीने २४ फेब्रुवारी रोजी लोकसत्तावादी लोकांनी जय मिळविला खरा; परंतु या जयानंतर या पक्षामध्ये एक रहातां, समाजसत्तावादी पक्ष इतर पक्षांतून फुटून, या पक्षानें आपल्या नवीन व चमत्कारिक मागण्या लोकांच्या पुढें मांडल्या. या पक्षाच्या प्रेरणेनें 'राष्ट्रीय कार- खाने' काढण्याची अवश्यकता सरकारास वाहूं लागून; ज्या लोकांना इतरत्र काम मिळत नाहीं अशा लोकांना राष्ट्रीय कारखान्यांत काम मिळवून देण्याची व्यवस्था अमलांत आणली गेली. समाजसत्तावादी पक्षाच्या चमत्कारिक मागण्या. मध्यंतरीं, फ्रान्समध्यें स्थापन झालेल्या नवीन लोकसत्ताक राज्य- पद्धतीची व्यवस्थित घटना ठरविण्यासाठीं नवीन 'राष्ट्रीय मंडळ' बोला- विण्यांत आलें. मे महिन्यांच्या सुमारास या मंडळाची बैठक होऊन, फ्रान्समधील राज्यव्यवस्था या मंडळाने पहिल्याप्रथम आपल्या हातीं घेतली. या नवीन राष्ट्रीय मंडळांत लोकसत्ताक पक्षाचे पुरस्कर्ते बरेच असल्या-