पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ वें . ] १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. २७३ देण्याचा अधिकार असल्यामुळे अवघ्या दोन लक्ष लोकांसच मतदार होतां येत असे. तेव्हां अशाप्रकारची चमत्कारिक स्थिति नाहींशी करून मत- दार लोकांची संख्या वाढवावी असें टॅअरचें म्हणणें होतें. गीझोच्या विरुद्ध लोकमत क्षुब्ध होतें. १८४८ च्या सुमारास गीझो हा मुख्य प्रधान होता; मतदार लोकांची संख्या वाढविण्याच्या बाबतींत त्याचें टॅअरला मुळींच पाठबळ नव्हतें. गीझोचा संकुचित स्वभाव व त्याचें अनुदार धोरण, अर्थातच टॅअर व त्याचे अनुयायी यांना आवडलें नाहीं; व लोकमत आपल्या बाजूचें करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविला. त्यांनीं ठिकठिकाणीं सभा भरवून . गीझोच्या धोरणाबद्दल निषेध व्यक्त केला. १८४८ मध्ये फेब्रुवारीच्या २२ व्या तारखेस, मतदार लोकांच्या संख्येत वाढ करणें जरूर आहे, व त्यावेळच्या मंत्रिमंडळाचें धोरण अनिष्ट आहे, हें दर्शवून त्याचा निषेध करण्यासाठी पॅरीस शहरीं एक जंगी सभा भरवि- अशाप्रकारची सभा भरवून देऊन आपला निषेध - सर्वांनी करावा हें गीझो यास इष्ट न वाटल्याने पोलिसच्या मदतीनें पॅरिस- • मधील लोकांची ही जंगी सभा मोडून टाकण्यांत आली; पण या त्याच्या कृत्यानें लोकांस त्याच्याबद्दल अधिक संताप वाटूं लागला ! गीझोच्या विरुद्ध असलेल्या लोकांच्या टोळ्या, पॅरिसमधील रस्त्यांवरून हिंदू लागून 'गीझोला मुख्य प्रधानाच्या जागेचा राजीनामा द्यावयास लावा' असें . म्हणं लागल्या. १८४८. ★ण्यांत आली. परंतु गीझोच्या विरुद्ध लोकमत बरेंच क्षुब्ध झालेलें आहे हें पाहून, दुस- याच दिवशीं ( २३ फेब्रुवारी) लुईनें गीझोचें प्रधानमंडळ मोडून टाकून कोणकोणत्या सुधारणा करणें इष्ट आहे यासंबंधानें वाटाघाट करण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्यंतरी शहरांत शांतता रहावी या हेतूनें दंगेखोरे • लोकांवर सैनिकांकडून गोळ्या झाडण्यांत आल्यामुळें राजाच्या तडजोडीच्या • बोलण्याकडे दुर्लक्ष करून लोक अधिकच चवताळले ! मोठमोठालीं घरें उध्वस्त