पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लोक प्रयत्न करूं लागले. अशा रीतीनें भांडवलवाले वर्ग व कामकरी वर्ग यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली. लुईच्या वेळीं या दोन वर्गांतील चढाओढ अगदींच नवीन असल्यामुळें, ही चढाओढ थांबविण्यासाठी कोणते उपाय योजावे हें लुईला न समजल्यास त्यांत कांहींच आश्चर्य नव्हतें ! ही चढाओढ सुरू असतां दुसराच एक 'समाजसत्तावादी' नांवाचा पक्ष निर्माण होऊन, त्याच्या प्रयत्नानें लाकांत नवीन चमत्कारिक मतें पसरूं लागली. तेव्हां या लोकांची चळवळ थांबविण्यासाठीं लुईला अर्थातच त्यांच्याविरुद्ध कडक उपाय योजावे लागले; परंतु त्यामुळे या पक्षांतील लोकांस लुईबद्दल तिटकारा मात्र वाटूं लागून ही मंडळी लुईच्या विरुद्ध असलेल्या लोकसत्तावादी पक्षास जाऊन मिळू लागली ! अशा रीतीनें लुई जरी धारणी होता, तरी त्यास निरनिराळ्या पक्षांची सहानुभूति संपादन करतां आली नाहीं. गीझो व टॅअर हे पुरुष तर वाङ्मयसेवा व इतर हलके हलके गीझो लुई फिलीपी याचा कल मध्यमस्थितींतील वर्गाकडे होता व त्या- मुळे या वर्गातील लोकांसच बहुदा मंत्रिमंडळांत जागा मिळे. कायदे करणाऱ्या मंडळांतही याच पक्षाचा भरणा असून, उदयास आले. केवळ राजकीय बाबतींतच नव्हे, बाबी यांमध्येही या पुढाऱ्यांस मोठा मान होता टॅअर हे प्रतिस्पर्धी होऊन प्रधानमंडळांत प्रमुख जागा पटकावण्याबद्दल एकमेकांविरुद्ध प्रयत्न करूं लागले. लुईच्या विरुद्ध जे तीन पक्ष होते, त्यांचा या दोन प्रमुख पुढाऱ्यांकडून तिटकारा होत असल्यामुळे, दोघांमध्यें वितुष्ट होण्याचें वास्तविक पहातां कांहींच कारण दिसत नव्हतें ! परंतु फ्रान्स- च्या पार्लमेंटसाठी उमेदवार निवडणाऱ्या मतदार लोकांची संख्या वाढ- वावी कीं नाहीं याबद्दल या दोन प्रमुख मुत्सयांमध्ये वितुष्ट आलें. फ्रान्स- च्या त्या वेळच्या मतदार लोकांच्या संख्येकडे पाहिलें म्हणजे ही संख्या वाढविणें जरूर आहे असें आपल्या तत्काळ निदर्शनास येईल. फ्रान्समध्यें एकंदर तीन कोट लोकसंख्या होती, तरी केवळ श्रीमंत लोकांसच मत