पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १७ वें . १८४८ मधील क्रान्तिकारक चळवळी. सन १८३० मध्यें लुई फिलिपी यास फ्रान्सच्या तक्तावर बस- विल्यावर कांहीं वर्षे फ्रान्समधील एकंदर राज्यव्यवस्था बरी चालली होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. लुई फिलिपी धोरणी व दूर- दर्शी असून पूर्वीच्या कोणत्याच घराण्याबद्दल यास अभिमान वाटत नस- ल्याने याच्या कारकीर्दीत फ्रान्समध्यें अस्वस्थता माजणार नाहीं असा संभव दिसत होता. परंतु लुई गादीवर येऊन कांहीं वर्षे लोटलीं नाहींत तोंच फ्रान्समध्यें चार निरनिराळे पक्ष अस्तित्वांत आले; व त्यांपैकीं तीन पक्षांस प्रस्तुतच्या राजाबद्दल यत्किंचितही आदरभाव वाटत नसल्याचें दिसून आलें. हे चारपक्ष म्हणजे, नेपोलियनच्या घराण्याबद्दल ज्यांना अभिमान वाटत असे बोनापार्टिस्ट पक्षाचे लोक, दुसरा ज्यांना बोरबोन घराण्याबद्दल सहानुभूति वाटते असा पक्ष, व तिसरा फ्रान्समध्यें लोकसत्ताच असणें इष्ट आहे असें वाटणाऱ्या लोकांचा पक्ष, असे तीन पक्ष लुई फिलिपीच्या विरुद्ध असून चवथ्या पक्षास मात्र लुईच्या विरुद्ध कांहींच म्हणावयाचें नसल्यामुळे या पक्षाकडेच आपली सहानुभूति आहे असें त्यास नाइलाजास्तव दाखवावें लागे. तेव्हां फ्रान्सच्या एकंदर परिस्थितीकडे पाहिल्यास आपल्या तात्काळ लक्षांत येईल कीं, कांहीं थोट्या मंडळीखेरीज लुईला कोणाचाच पाठिंबा नव्हता. • एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून भांडवलवाल्या वर्गाचा सर्वत्र उदय होत होता, असें म्हणण्यास हरकत नाहीं. या वर्गाच्या प्रेरणेनें देशांत चोहोंकडे लहान लहान धंदे निर्माण झाले व कामकरी वर्गाची वाढ होऊं लागली. मोठमोठ्या शहरांमध्यें चोहोंकडून कामकरी गोळा होऊं लागले. शिक्षणामुळें त्यांच्या अंगीं असलेल्या ज्ञानांत भर पडून या वर्गातील लोकांनीं कामकरीवर्गाची वाढ. आपले कामकरीसंघ निमाण केले, व 'राजकीय हक्कांसाठीं या वर्गातील