पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १६ वें. ] अशा प्रकारचीं फर्मानें निकोलसनें सोडलीं ! निकोलसच्या वरील जुलमी कृत्यानें पोलिश राष्ट्राचें अस्तित्वच नाहींसें झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं. राशयानें पोलंडला आपला गुलाम करून सोडलें; परंतु इतकें जरी झालें तरी पोलिश लोकांच्या मनांतील अढी मात्र शियाला नष्ट करतां आली नाहीं ! पुनरपि आपलें स्वातंत्र्य आपणास मिळवितां येईल अशी पोलिश लोकांनीं आपली आशा कधींच सोडली नाहीं ! व सध्यांच्या महायुद्धानंतर तर त्यांची आशा सफल होण्याचा रंग दिसत आहे.