पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ लें. ] स्पेनच्या राष्ट्रास लागलेली कीड. विषय-प्रवेश. २९ थोडेफार अधिकारही काढून घेतल्यावर धार्मिक बाबींमध्येही स्पॅनिश लोकांवर जुलूम होऊं लागले. महमदीधर्मीय मूर लोकांचा नायनाट करण्यासाठी पहिल्या प्रथम निर्माण करण्यांत आलेल्या धर्मकोर्टाकडून मध्य- युगाच्या शेवटीं शेवटीं सामान्य जनतेमध्यें फैलाव होणाऱ्या नवीन कल्पना व नवे विचार पूर्णपणें दपटून टाकण्याचा प्रयत्न झाल्यामुळे स्पेनचें वैभव राजकीयदृष्ट्या बाहेरून वाढतें आहेसें भासलें तरी त्यास आंतून कीडच लागली होती असें म्हटलें पाहिजे. फर्डिनंडनंतर त्याचा नातू चार्लस (१५१६-५६ ) हा स्पेनच्या गादीवर आला. यावेळी स्पेनचें राष्ट्र सर्व युरोपमध्यें फारच बलाढ्य समजलें जात असून स्पेनच्या ताब्यांत असलेला मुलूखही बराच विस्तृत होता. यानंतर तीनच वर्षांनीं ( १५१९), बाद- शहा मॅग्झिमलन याच्या मृत्यूनंतर, चार्लस - चाच ( चार्लस हा मॅग्झिमीलनचा नातू होता ), रोमन पादशाहीच्या बादशाही पदा स्पेनचा राजा चार्लस याची पवित्र रोमन साम्राज्याच्या पादशाही पदावर निव- डणूक होते. झाल्यानें ऑस्ट्रियाचें हॅप्सवर्ग घराणें व स्पेनचें बोरबोन घराणें यांचा मिलाफ होऊन या दोन्ही घराण्यांच्या अमलाखालीं असलेला स्पेन, ऑस्ट्रियाचें संस्थान, बर्गेडी, नेदर्लंड, नेपल्स वगैरे विस्तीर्ण प्रदेश एकाच राज्यकर्त्याच्या ताब्यांत आला व बादशहा ५ वा चार्लस याचें युरोपमधील प्रस्थ बरेंच माजलें ! पंधराव्या शतकाच्या शेवटीं इंग्लंडमधील यॉर्क व लॅकेस्टर या दोन प्रतिस्पर्धी घराण्यांमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टांत येऊन, यॉर्क व लॅकेस्टर या दोन्हीही घराण्यांशीं संबंध असलेल्या ट्यूडर घराण्यांतील पुरुषास राज्यपद मिळाल्यानें, इंग्लंडांतील प्रमुख घराण्यांमधील अंतस्थ दुफळी संपुष्टांत आली. १४८५ मध्ये इंग्लंडच्या गादीवर येणारा ७ वा २