पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ स्पेनचें राष्ट्र. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण दिवसांत शक्य झाली ! पंधराव्या शतकाच्या शेवटीं अरेगान संस्थानाचा भावी राजा फर्डिनंड (१४७९ - १५१६ ) व कास्टॉ- इलची भावी राणी इझाबेला यांच्यामध्यें विवाह घडून आल्यानें या दोन्ही संस्थानांचें एकीकरण होऊन स्पेनचें एक संघटित राष्ट्र बनण्याचा मार्ग सुकर झाला. फर्डिनंड -गादीवर आल्यावर या दोन संस्थानांचे पूर्णपणें एकीकरण झालें, व त्यांनीं · मोठा प्रयत्न करून मूरलोकांचें स्पेनमधील गॅनेडा हें संस्थान खालसा करून महंमदीधर्मीय मूर लोकांची सत्ता पार संपुष्टांत आणिली ! स्पेनचा उत्कर्ष. स्पेनचें एकीकरण झाल्यावर स्पेनचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला व सोळाव्या शतकामध्यें युरोपमध्यें त्यास प्रमुख स्थान पटकावतां आलें. स्पेनचा राजा फर्डिनंड याच्या आश्रयाखालीं कोलंबसनें अमेरिका खंडाचा शोध लावल्यापासून तिकडे आपल्या वसाहती स्थापन करण्याची स्पॅनि- अर्ड लोकांस साहजिकच इच्छा उत्पन्न झाली. इकडे १५०४ च्या सुमारास फ्रान्सचा राजा ८वा चार्लस याचा पराभव करून फ्रान्सच्या ताब्यांत असलेलें नेपल्सचें संस्थान स्पेनला मिळालें; व यानंतर १५९२ मध्ये * फ्रान्स व स्पेन यांच्या दरम्यान असलेलें नॅव्हरीचें संस्थान स्पेनला मिळाल्या- • मुळें पिरनीज पर्वतापासून खालीं भूमध्यसमुद्रापर्यंत स्पेनला कोणताही · शत्रु उरला नाहीं. फर्डिनंडनें आपल्या अमदानींत स्पेनचें वर्चस्व वाढविलें, तसेंच आपल्या राज्यांत राजसत्ता अनियंत्रित व एकमुखी करण्यासाठीं - त्याचे प्रयत्न सुरू झाले. अमीरउमरावांची व सरंजामी पद्धतीमुळे ज्यांचें - बरेंच प्रस्थ माजलें होतें अशा सरदार लोकांची सत्ता कमी करण्याच्या - कामी फर्डिनंडला पूर्णपणें यश येऊन स्पेनमध्यें अनियंत्रित राजसत्ता • पूर्णपणे प्रस्थापित झाली. यानंतर स्पेनमध्यें लोकमतदर्शक असलेल्या पार्लमेंटची तुटपुंजी सत्ताही पूर्णपणे काढून घेण्यास फर्डिनंडला अडचण पडली नाहीं. अशा प्रकारें राजकीय बाबतींत लोकांच्या हातांत असलेले