पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ वें . ] राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी. २६७ बेल्जममधील राज्यक्रान्ति. आहे याची नुसती विचारपूस देखील न करतां हॉलंडच्या राष्ट्राशीं हें राज्य जखडून टाकून या नवीन झालेल्या राज्यास नेदरलंडचें राज्य असें नांव देण्यांत येऊन ऑरेंज घराण्यांतील एका पुरुषास तेथील राजपद देण्यांत आलें. व्हिएन्ना येथील परिषदेनें ठरविलेल्या या घटनेस, बेलजम- मधील लोकांचा पहिल्यापासूनच विरोध होता. हॉलंडसारख्या बारक्या राष्ट्रानें आपणावर हुकमत चालावावी हें बेलूजम- मधील जनतेस न आवडून आपणास स्वतंत्र राज्य- कारभार देण्याविषयीं त्यांनीं मागणी केली. परंतु हॉलंड व बेल्जम या संयुक्त राज्यावरील राजा वुइल्यम यानें जेव्हां बेलू- जममधील लोकांची मागणी नाकरली, तव्हां बेलूजममधील जनतेनें फ्रेंच लोकांचें अनुकरण करून बंड करण्याचे ठरविलें. बेलजममधील बंडानें युरो- पियन राष्ट्रांची लंडन शहरीं एक परिषद भरून त्यांनीं बेल्जमची कायमची व्यवस्था करण्याचें ठरविलें. त्यावेळेस रशिया, प्रशिया, आस्ट्रिया येथील बादशहांना आपापल्या राज्यांतील चळवळींकडे लक्ष पुरवावयाचें असल्यामुळें, इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनीं बेलूजमबद्दल ठरविलेल्या व्यव• स्थेस अनुमति दिल्यावांचून गत्यंतर नव्हतें ! तेव्हां सर्व राष्ट्रांनी बेल्जमचें स्वातंत्र्य कबूल करून, बेलजमचा प्रदेश युद्ध- क्षेत्र न समजण्याविषयीं हमी दिली. बेल्जमचें स्वातंत्र्य . कबूल केल्यावर बेल्जमची अंतर्व्यवस्था कशाप्रकारची असावी, हें ठरविण्यासाठी बेलूजममधील लोकांची एक ‘काँग्रेस’ बोलाविण्यांत आली (१८३० नोव्हेंबर ). या बैठकींत बेल्जममध्यें लोकनियंत्रित राज्यपद्धति असावी असें ठरवून 'सॅक्स - कोबर्ग' च्या जर्मन संस्थानांतील लिओपोल्ड या राजपुत्रास तेथील राज्यपद स्वीकारण्याविषयीं बोलाविलें. लिओपोल्ड जरी परकीय होता, तरी त्यानें कुशल रीतीनें राज्यकारभार करून ( १८३१-१८६५ ) बेलूजममधील लोकांचें प्रेम संपादन केलें. -बेल्जमचें एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण होतें १८३०.