पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लुई फिलिप यास राज्यपद देण्यांत येते. होतें. परंतु १० व्या चार्लसच्या हातून लोकनियंत्रित राज्यपद्धतीचा पुरस्कार होण्याचें कांहींच चिन्ह न दिसल्यामुळे त्यास पदच्युत करून फ्रान्सचें राज्यपद बोरबोन घराण्यांतील 'लुई फिलिपी' नांवाच्या पुरुषास देण्याचें पुढारी मंडळींनी ठरविलें. लुई फिलिपी यानें पूर्वी फ्रेंच राज्यक्रान्तीच्या वतीनें राजपक्षीय लोकां- विरुद्ध लढण्यांत भाग घेतला होता व त्यावेळीं आपला कल लोकांच्या बाजूला आहे असें त्यानें दर्शविले असल्यानें ल्यास राज्यपद देण्यांत आल्यास त्याच्याकडून लोकनियंत्रित राज्यपद्धती- स विरोध व्हावयाचा नाहीं अशी सर्वांची खात्री होती. फ्रान्समधील नेमस्त पुढाऱ्यांकडून त्यास राज्यपद स्वीकारण्याबद्दल विनंति करण्यांत आल्यावर लुईनें पहिल्याप्रथम आपणास राज्यपद नको असल्याचा बहाणा केला; परंतु सरतेशेवटीं लोकसभेनें आपणास राज्यपद देऊं केल्यास आपण तें स्वीकारूं असें त्यानें कबूल केलें. थोडक्याच दिवसांनीं भरलेल्या लोकसभेनें लुई फिलिपी यास राज्यपद देण्याचा ठराव पास केला; व 'लुईनें फ्रेंचांचा राजा' असा किताब धारण करून लोकनियंत्रित राज्यपद्धतीनें राज्यकारभार चालविण्याचें अभिवचन दिलें. फ्रेंच लोकांचा वरील निर्धार पहातांच १० व्या चार्लसचें धाबे दणाणलें व त्यानें एकदम राज्यपदाचा त्याग करून फ्रान्समधून पाय काढला. १८३० च्या जुलै महिन्यांत फ्रान्समध्यें घडून आलेल्या राज्य- क्रान्तीची बातमी लागलीच चोहोंकडे पसरली; व फ्रान्सचें अनुकरण करून आपापल्या राष्ट्रांतील जुलमी अनियंत्रित राज्यपद्धति हाणून पाडण्याची प्रत्येक राष्ट्रांतील जनतेस आशा वाटूं लागली. १८३० मध्ये युरोपियन राष्ट्रांनी एकामागून एक फ्रान्सचें अनुकरण करून राज्यकारभारांत लोकप्रतिनिधीं- चा शिरकाव करण्याची खटपट सुरू केली. व्हिएन्ना येथील परिषदेकडून कोणत्या राष्ट्राचें विशेष नुकसान झालें असेल तर तें बेलूजमचेंच होय ! बेलूजममधील लोकांची इच्छा काय