पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण व्हिएन्नाच्या परिषदेनें बेल्जमप्रमाणें जर्मनी व इटली या दोन प्रदेशांची तेथील जनतेचा मुळींच विचार न घेतां आपणास पाहिजे तशी व्यवस्था लावली असल्यामुळे, १८३० मधील बेजलूममधील लोकांचे प्रयत्न पाहून या दोन प्रदेशांतील जनता देखील राज्यकारभारांत लोकांचा हात असावा अशी मागणी करील असें वाटूं लागलें ! जर्मनीमध्यें आस्ट्रिया व प्रशिया हीं दोन प्रमुख संस्थानें असून जर्मनीतील राजकारण येथील राज्यकर्त्यांच्या धोरणावरच अवलंबून असे... प्रशिया व आस्ट्रिया येथील लोकांना आज बरीच वर्षे अनियंत्रित राज्य- पद्धतीच्या अंमलाखाली रहाण्याची संवय असल्याने तेथील लोकांनीं १८३० सालीं फ्रान्सचें अनुकरण करण्याचा प्रयत्न केला नाहीं. परंतु जर्मनीतील इतर लहान लहान संस्थानांतील लोकांच्या मनांत नवीन आशा उद्भूत होऊन आपापल्या संस्थानांच्या कारभारांत भाग देण्याची लोकांनी राजांकडे मागणी केली. या वेळीं लोकांच्या मागणीचा या लहान लहान संस्थानांच्या राज्यकत्यांकडून योग्य विचार झाल्यानें तेथील लोकांना आपापल्या संस्थानांच्या राज्यकारभारांत थोडाफार भाग मिळाला. अशा रीतीनें १८३२ च्या सुमारास जर्मनींतील आस्ट्रिया व प्रशिया या दोन बलाढ्य संस्थानांतील जनतेखेरीज इतर संस्थानांच्या लोकांस राज्यकारभारांत भाग मिळाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. जर्मनींतील लहान लहान संस्थानांतील जनतेस राज्यकारभारांत भाग मिळतो. १८२० मध्ये नेपल्समधील चळवळीचा आस्ट्रियाकडून पूर्ण मोड़ झाल्याची आठवण इटालियन लोक अजून विसरले नव्हते ! तेव्हां १८३० मध्ये इतर युरोपियन राष्ट्रांची चळवळ पाहून इटलीमध्यें कस- ल्याच प्रकारची चळवळ झाली नाहीं ! इटलीमध्यें चळवळ झाल्यास तिचा बीमोड करतां यावा म्हणून मेटर्निचनें लॉबर्डीमध्यें आस्ट्रियन सैन्य जय्यत तयार ठेवलें होतें !