पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ वें . ] राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी. २६५ १० व्या चार्लसची जुलमी राज्यपद्धति. होता तर इकडे अमीरउमराव मात्र त्याचें विनाकारण देव्हारें माजवीत होते ! चार्लसनें गादीवर आल्यावर आपल्या खुष- मस्कन्या अमीर उमरावांस खूष करण्यासाठीं, व गेल्या राज्यक्रांतीच्या वेळीं त्यांच्या झालेल्या नुक- सानीची भरपाई करण्यासाठी १० कोटी फ्रँक रक्कम त्यांना देण्यासाठीं मंजूर करून घेतली ! त्यानंतर देशांतील छापखाने व विश्वविद्यालये यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यांत आला. इतक्या थरावर गोष्ट गेली तेव्हां चार्लसच्या कृत्यांस पाठबळ देण्याचें फ्रान्समधील कॉमन्स सभेनें नाकारलें, कामन्स सभेचें असें उद्दाम वर्तन पाहून १८३० मध्ये कामन्स सभा बंद करण्यांत आली. त्यानंतर फ्रेंच जनतेस अप्रिय असलेल्या पॉलिग्न्यॅक नांवाच्या मुख्य प्रधानाच्या संमतीनें चार्लसनें पार्लमेंटची संमति न घेतां आपल्याच अधिकारानें जाहीरनाम्यांच्या द्वारें मतदार लोकांची संख्या पुष्कळ कमी करून छापखान्यांची मुस्कटदाबी केली ! अशा रीतीनें चार्ल- सर्ने राष्ट्रांत असलेली पार्लमेंटची सत्ता पार झुगारून देऊन सर्व सत्ता आपल्या अनियंत्रित हातांत घेतली. फ्रान्समधील क्रान्ति- चार्लसच्या या जुलमी कृत्याचा सर्वासच त्वेष आला. फ्रान्समधील सर्व तरुण मंडळी रस्त्यांतून टोळ्या करून हिंडूं लागली ! प्रधानमंडळ व राजा यांस पदच्युत करण्याविषयीं सर्वजण बोलूं लागले ! आतां पुनः फ्रान्समध्यें पूर्वीप्रमाणेंच बेबंदशाही माजते कीं काय असा रंग दिसूं १८३०. लागला ! राजा व प्रधानमंडळ यांच्याविरुद्ध उठ- लेल्या फ्रेंच जनतेस आंवरून धरण्यास फ्रान्समधील लष्कर अगदींच असमर्थ होतें ! कारक चळवळ फ्रान्समध्यें वरील प्रकारानें सर्वत्र अंदाधुंदी माजली असल्यामुळें आतां काय करावें हा विचार लोकपक्षीय पुढाऱ्यांवर पडला. फ्रान्समध्यें पुनः स्वस्थता राहून व्यवस्थित राज्यपद्धति असावी असें सर्वासच वाटत १७