पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण ठरविण्यांत आलें. आटो हा ग्रीसचा पहिला राजा असून त्यानें १८६२: पर्यंत राज्य केलें. व्हिएन्नाची परिषद् भरल्यापासून स्वराज्यप्राप्तीच्या प्रयत्नांत ग्रीकं राष्ट्राच्या प्रयत्नास अग्रस्थान दिलें पाहिजे. ग्रीक राष्ट्रानें अनेक अडच- णींस न जुमानतां जुलमी राज्यकर्त्यांची सत्ता झुगारून देऊन आपलें स्वातंत्र्य मिळविलें. ग्रीक राष्ट्राच्या या उदाहरणावरून युरोपमधील इतर राष्ट्रही धडा घेतात कीं काय हेंच आतां पाहिलें पाहिजे. वाटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव झाल्यावर फ्रान्सच्या तक्तावर दुसऱ्यांदां १८ व्या लुईस बसविण्यांत आलें. लुईबरोबर फ्रान्स- मधून नेपोलियनच्या अमदानींत पळून गेलेले बरेच अमीर उमरावही आतां परत आले. पण गेल्या वीस वर्षांत बदललेल्या परिस्थितीवरून या अमीर- फ्रान्समधील चळवळ. उमरावांनीं कांहींच धडा घेतलेला नव्हता ! फ्रान्स- मधील राज्यक्रान्तीच्या पूर्वी ज्याप्रमाणें आपणास वाटेल तसें वागतां येत होतें, तसें आतांही वागतां येईल अशी त्यांची समजूत होती ! परंतु फ्रान्सच्या गादीवर बसलेला १८ लुई दूरदर्शी होता. आतां बदललेल्या परिस्थितीप्रमाणें आपणास वागले पाहिजे हें त्याच्या लक्षांत आलें. लोकमतास मान न देतां त्यांच्या आकांक्षा चेपून टाकण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्याचा परिणाम अनिष्ट होईल त्यास कळून चुकलें; व म्हणून त्यानें सनदशीर पद्धतीनें राज्य करण्याचें कबूल करून फ्रान्समध्यें कायदे करण्यासाठीं ' लॉर्ड लोकांची ' व मध्यम स्थितींतील लोकांची ' अशा दोन सभा स्थापन केल्या. C १८ व्या लुईच्या अमदानींत सर्व कांहीं सुरळीत चाललेलें होतें; परंतु अठराव्या लुईनंतर (१८२४ ) जेव्हां त्याचा भाऊ १० वा चालिस गादीवर आला, तेव्हां लवकरच फ्रान्समध्यें अनर्थपरंपरा कोसळणार अशीं चिन्हें दिसूं लागलीं. १० व्या चार्लसविषयीं लोकांना तिटकारा वाटत