पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ वे. ] राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी. २६३ लोकांचा आपल्या सैनिकांकडून वध करविला; परंतु ग्रीक राष्ट्रानें सुल- तांनांच्या या जुलमी कृत्यानें भेदरून न जातां आपल्या स्वराज्यप्राप्तीच्या प्रयत्नांत खंड पडूं दिला नाहीं. ग्रीस देशांतील क्रांति- कारक चळवळ. ग्रीक राष्ट्र ख्रिश्चन असून आपल्या महमदी धर्माच्या जुलमी राज्य- कर्त्यांविरुद्ध स्वराज्यप्राप्तीसाठीं प्रयत्न करीत होतें, तरी बरेच दिवस युराोपयन ख्रिश्चन राष्ट्रं त्याच्या मदतीस धांवून गेलीं नाहींत. सरतेशेवटीं १८२६ च्या सुमारास इंग्लंडच्या परराष्ट्रीय प्रधानानें रशियाचा बादशहा निकोलस ( १८२५–१८५५) यास ग्रीकच्या वतीनें आपणाबरोबर मध्यस्ती करण्यासाठीं वळविलें. त्यानंतर लागलीच फ्रान्सनें देखील ग्रीक लोकांच्या वतीनें मध्यस्ती करण्याचें कबूल केलें. परंतु इंग्लंड, फ्रान्स व रशिया या राष्ट्रांनीं मध्यस्ती केली असतांना देखील जेव्हां ग्रीक लोकांना स्वराज्याचे हक्क देण्याचें टर्कीनें नाकारलें तेव्हां या तीन युरोपियन राष्ट्रांच्या संयुक्त आरमारांनीं टर्कीच्या आरमाराचा नॅव्हीरीनो या ठिकाणीं पुरा मोड केला ( १८२७ ). ग्रीक लोकांच्या स्वराज्यप्राप्ती- `च्या प्रयत्नांत त्यांस यश मिळावें म्हणून युरोपांतील कितीतरी लोकांनी आपखुषीनें ग्रीक सैन्यांत आपलीं नांवें दाखल केलीं होतीं ! ग्रीक लोकांना स्वराज्य दिल्याखेरीज गत्यंतर नाहीं हें टर्कीच्या सुलतानास कळून चुकलें; परंतु सुलतानाकडून या कामीं विलंब होत आहे हें पाहून रशियानें टर्कीच्या डॅनूब नदीच्या आसपास असलेल्या प्रदेशावर स्वारी केली व टर्कीच्या सुलतानास ॲड्रिआनोपलचा तह ( १८२९ ) करण्यास भाग पाडलें. या तहानें टर्कीच्या सुलतानानें बाल्कन द्वीपकल्पां- तील, सर्व्हिया, मोल्डोव्हिया, वॉलेचिया या प्रमुख प्रांतावर ख्रिश्चन गव्हर्नर ठेवण्याचें वचन देऊन ग्रीक राष्ट्राचें स्वातंत्र्य कबूल केलें. त्यानंतर युरोपियन राष्ट्रांची एक मोठी परिषद लंडन शहरीं भरविण्यांत आली व त्या ठिकाणीं बव्हेरियाचा राजपुत्र ऑटो यास ग्रीकचें राज्यपद देण्याचें