पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ लोकपक्षीय चळवळी युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण मोठी धुमश्चक्री सुरू होईल व युरोपवर अनर्थपरंपरा कोसळेल असें मेट- र्निचनें प्रतिपादन केलें. मेटर्निचच्या म्हणण्याचा युरोपियन राष्ट्रांतील मुत्सद्यांवर परिणाम होऊन ह्या चळवळी हाणून पाडण्याचा ठराव पास झाला; व नेपल्समधील चळवळ हाणून पाडण्याचें काम हाणून पाडण्याचा प्रयत्न. ऑस्ट्रियाकडे सोपविण्यांत आलें ! ऑस्ट्रियन सैन्याविरुद्ध टिकाव धरण्याचें सामर्थ्य नेपल्समधील लोकांच्या अंगीं मुळींच नव्हतें ! ऑस्ट्रियन सैन्य दाखल होतांच तेथील लोकपक्षीयांचा पाडाव होऊन नेपल्समधील राजा फर्डीनेंड, याच्या हातीं पुनरपि अनियंत्रित सत्ता देण्यांत आली. लोकपक्षीय पुढा-यांकडून सुरू होणान्या चळवळी दडपून टाक- ण्याच्या पहिल्याच प्रयत्नांत सहजरीत्या यश मिळाल्यामुळे मेटर्निचला आनंद झाला; व आतां स्पेनमधील राजकारणांतही हात घालण्याची त्यास साहजिकच इच्छा झाली. १८२२ मध्यें व्हेरोना येथें भरलेल्या परिषदेंत स्पेनमधील चळवळ मोडून टाकण्याचें काम फ्रान्सकडे सोंपविण्यांत आलें. फ्रान्सच्या मदतीनें पुनः स्पेनमध्यें अनियंत्रित राज्यपद्धति स्थापण्यांत आली; व या विजयोत्सवासाठीं फर्डिनंडने तेथील बऱ्याच लोकपक्षीय पुढाऱ्यांस फांशीं दिलें ! अशा रीतीनें पश्चिम युरोपमधील राष्ट्रं आपल्या राज्यकर्त्यांचें जुलमी जूं आपल्या मानेवर घेत असतां पश्चिमेकडील एका लहानशा राष्ट्रानें स्वातंत्र्यासाठीं व स्वराज्यासाठी मोठी चळवळ सुरू केली, व हें लहानसें राष्ट्र म्हणजे ग्रीक राष्ट्रच होय ! १८२१ च्या सुमारास आटोमन टर्कीच्या जुलमी अमलाखालीं असलेल्या या लहानशा राष्ट्रानें टर्कीच्या सुलतानाचें जूं आपल्या मानेवरून झुगारून देण्याचा प्रयत्न केला. ग्रीक राष्ट्राच्या या कृत्यानें सुलतानास त्वेष येऊन त्यानें मोठ्या क्रूरतेनें वीस हजार ग्रीक