पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ वें . ] राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी. २६१ देशहितदक्ष देशभक्तांचा छळ करण्याचा उपक्रम फर्डीनेंडनं सुरू केला.. अशा रीतीनें आपल्या प्रतिगामी धोरणाप्रमाणें आचरण करीत असतां १८२० च्या सुमारास फर्डीनेंडने सर्व सत्ता आपल्या एकतंत्री हातांत घेऊन लोकमत पायाखालीं तुडविण्याचा प्रघात पाडला. ! फर्डीनेंडची वरील जुलमीं कृत्यें पाहून त्याच्याविरुद्ध बंड करण्यासाठीं स्पॅनिश देशभक्त उद्युक्त झाले ! आपल्याविरुद्ध स्पेनमधील प्रत्येक मनुष्य उठत आहे हें पाहून फर्डिनंड जरा नरम आला व त्यानें घाबरून जाऊन १८९२ साली स्पॅनिश देशभक्तांनीं केलेली घटना कबूल करून त्याप्रमाणें वागण्याचें. अभिवचन दिलें. स्पेनच्या जनतेनें आपल्या राजाकडून लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या घटनेप्रमाणें वागण्याचें अभिवचन घेऊन फार दिवस झाले नाहींत तोंच तशाप्रकारची चळवळ नेपल्समध्येही सुरू झाली. नेपल्सच्या गादीवर अस- नेपल्समधील चळवळ - १८२०. लेल्या बोरबोन घराण्यांतील दुसऱ्या एका फर्डीनेंडास तेथील लोकांनीं घाबरवून टाकून लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या घटनेप्रमाणें राज्य करण्याचें अभिवचन घेतलें. स्पेन व नेपल्स येथें घडून आलेल्या प्रकारामुळे आस्ट्रियाचा प्रधान मेटर्निच यास्त्र अर्थातच राग आला; व त्यानें सर्व युरोपियन राष्ट्रां-- तील मुत्सयांची सभा बोलावली. या परिषदेंत वर सांगितलेल्या चळवळींचा उल्लेख करून त्या हाणून पाडण्याचें आपलें कर्तव्य आहे असें त्यानें प्रतिपादन केलें. नेपल्स व स्पेन येथील चळवळी हाणून पाडण्या- चा युरोपांतील मोठमोठ्या राष्ट्रांतील मुत्सयांनीं प्रयत्न केला नाहीं ; तर ही चळवळींची लाट युरोपमधील प्रत्येक राष्ट्रांत जाऊन पुनः युरोपमध्ये