पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण निर्माण करतां आला तर बरें असें वाटून एक संघ स्थापण्यांत आला. या संघातर्फे काम करण्यासाठी फ्रँकफॅर्ट येथें एक प्रतिनिधिमंडळ बोलावि- ण्यांत येऊन जर्मनींतील ३९ संस्थानांना त्या सभेत प्रतिनिधी पाठविण्याची विनंति करण्यांत आली. परंतु या प्रतिनिधींना विशेष असे कोणतेच अधिकार देण्यांत न आल्यामुळे त्या प्रतिनिधि सभेस कांहींच करतां येणें शक्य नसल्यानें त्यांची बैठक व तेथील भाषणें म्हणजे निव्वळ फार्सच उडत असे ! व्हिएन्ना शहरीं भरलेल्या सर्वराष्ट्रीय परिषदेचें धोरण कशा प्रकारचें होतें हें आपण पाहिलेंच आहे. या धोरणाप्रमाणें प्रत्येक गोष्ट अमलांत आणण्यासाठी व या धोरणाच्या विरुद्ध जाण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यास शासन करण्यासाठीं रशिया, ऑस्ट्रिया व प्रशिया या तिघां प्रति- गामी राष्ट्रांतील बादशहांनीं आपापसांत तह केला. या तहाप्रमाणें व्हिएन्ना येथे भरलेल्या परिषदेनें ठरविलेल्या घटनेविरुद्ध जर कोणत्या राष्ट्रानें आपली नाखुषी दर्शविली व चळवळ करण्याचा प्रयत्न केला तर या तिघां बादशहांनीं ती चळवळ चेपून टाकण्याचें ठरविलें. नेपोलियनच्या पाडावानंतर ऑस्ट्रिया, प्रशिया व रशिया यांच्या बादशहांनी अरेरावी पद्धतीनें ठरविलेल्या धोरणाविरुद्ध नाखुषी दर्शवून त्याविरुद्ध चळवळ करण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल तर तो स्पेननेंच होय ! व्हिएन्ना येथील परिषदेनें स्पेनच्या गादीवर पूर्वीच्या बोरबोन घराण्यांतील ७ वा फर्डीनेंड यास बसविलें होतें. गादीवर आल्यावर स्पेनमधील चळवळ. फर्डीनेंडनें आपल्या वाडवडिलांप्रमाणे सर्व सत्ता अनियंत्रितपणें आपल्या हातांत घेण्याची खटपट सुरू केली; व स्पॅनिश देशभक्तांनीं १८१२ मध्यें तयार केलेली राज्यघटना पार मोडून टाकली ! त्यानंतर नेपोलियनच्या -अमदानींत स्पेनमध्यें करण्यांत आलेल्या सर्व सुधारणा नाहींशा करून,