पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण व्हिएन्ना येथें भरलेल्या परिषदेनें एकराष्ट्रीयत्वाच्या व उदार राज्य- पद्धतीच्या विरुद्ध खटपट करून पूर्वीच्या जुलमी बादशहांच्या घराण्यांतील पुरुषांस, त्या त्या राष्ट्रांच्या गादीवर बसविण्याचा परिषदचें प्रतिगामी घोरण. प्रयत्न केला तरी या परिषदेचें धोरण नवीन विचारांनीं प्रेरित झालेली जनता मुकाट्यानें मान्य करील असा संभव दिसत नव्हता ! ' स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व, एक- राष्ट्रीयत्व व लोकनियंत्रित राज्यपद्धति' या व अशा प्रकारच्या कल्पना फ्रान्समधील राज्यक्रान्तीच्या काळांत उद्भूत होऊन त्या सर्व युरोपियन राष्ट्रांतील जनतेमध्यें पसरलेल्या असल्यामुळे या कल्पनांच्या विरुद्ध आपलें धोरण व्यक्त करणाऱ्या परिषदेवर चोहोंकडून टीकाप्रहार आज नाहीं उद्यां होऊन त्या धोरणाविरुद्ध प्रत्येक राष्ट्रांतील जनता चळवळ करील. असें स्पष्ट दिसत होतें ! व्हिएन्ना परिषदेनें प्रमुख राष्ट्रांस दिलेला मुलूख. व्हिएन्ना येथें भरलेल्या परिषदेने पहिल्याप्रथम विजयी झालेल्या राष्ट्रांचा गेल्या वीस वर्षांत गमावलेला प्रदेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला.. ऑस्ट्रिया व प्रशिया या दोन राष्ट्रांस आपला पूर्वीचा सर्व प्रदेश मिळाला इतकेंच नव्हे तर थोडा जास्तच मुलूख मिळाला. ऑस्ट्रियाचें इटलीवर वर्चस्व कायम झालें, व प्रशियाला पश्चिम जर्मनीमधील कांहीं प्रांत मिळाला. आस्ट्रिया व प्रशिया यांच्या मुलखांतून पोलंडपैकीं कांहीं भाग तोडण्यांत येऊन पोलंडचें राज्य निर्माण करण्यांत आले व त्याचें राज्यपद रशियाचा झार अलेक्झांडर यास देण्यांत आलें. इंग्लंडला डच लोकांच्या दक्षिण आफ्रिकेंतील वसाहती मिळाल्या. अशा रीतीनें नेपोलियनचा पाडाव करण्यामध्यें ज्या ज्या राष्ट्रांनीं प्रमुख भाग घेतला होता त्या त्या राष्ट्रांस आपल्या कामगिरीबद्दलं थोडाफार मोबदला मिळाला असें म्हणण्यास हरकत नाहीं.