पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १६ वें . राज्यकत्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी. कटरलच्या लढाईत नेपोलियनचा पराभव होऊन त्याची मोठ्या बंदोबस्तानें सेंट हेलेना बेटांत रवानगी झाल्यावर हिएन्ना येथें जमलेल्या युरोपियन राष्ट्रांतील प्रतिनिधींना युरोपची नवी मांडणी स्वस्थपणे करतां आली ! त्यावेळेस झालेल्या एकंदर वादविवादा- कडे, व त्या परिषदेनें केलेल्या नवीन मसुद्याकडे व्हिएन्ना येथे भर- लेली युरोपियन राष्ट्रांची परिषद. पाहिलें असतां, फ्रान्समधील राज्यक्रान्तीनें उत्पन्न झालेल्या एकराष्ट्रीयत्वाच्या व लोकनियंत्रित राज्य- पद्धतीच्या कल्पना पार चेंपून टाकून पुनरपि १७८९ च्या पूर्वीची परिस्थिति युरोपमध्यें प्रस्थापित करावी असें तेथें जमलेल्या मुत्सद्यांचें धोरण दिसत होतें. गेल्या वीस वर्षांत युरोपमध्यें चाललेल्या धुमश्चक्रीचा सर्वांस वीट आला होता, व ज्या फ्रेंच राज्य- कान्तीच्या प्रेरणेनें व ज्या राज्यक्रान्तीमध्यें उत्पन्न झालेल्या नवीन कल्पनेनें ही धुमश्चक्री चाललेली होती, त्या कल्पना व ते विचार पार चेंपून टाकून पूर्वीची स्थिति प्राप्त करून घेण्यासाठीं युरोपियन राष्ट्रांचा कल जावा यांत कांहींच नवल नव्हतें ! परंतु फ्रेंच · राज्यक्रान्तीच्या पूर्वीची स्थिति प्राप्त करून घेण्यासाठीं या परिषदेस एक- · राष्ट्रीयत्वाच्या व उदार धोरणाच्या कल्पनेस अर्थातच फांटा द्यावा लागला ! -या परिषदेमध्यें निरनिराळ्या प्रमुख युरोपियन राष्ट्रांतून जे मुत्सद्दी आले होते, त्यांमध्यें ऑस्ट्रियाचा मुख्य प्रधान मेटर्निच यानें प्रमुख भाग घेतला असून आपलें वजन सर्वावर बसविलें होतें; व याच्याच प्रेरणेनें मुख्यतः - त्या परिषदेचें धोरण ठरविण्यांत आलें होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं.