पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १५ वें. ] भवानंतर नेपोलियननें पॅरिसकडे पळ काढून आपण राज्यपदाच्या त्याग केला असल्याचें जाहीर केलें ! फ्रान्समधून अमेरिकेला पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना नेपोलियनला पकडण्यांत आलें व त्यास मोठ्या बंदोबस्तानें सेंट हेलेना बेटांत ठेवण्यांत आलें. या ठिकाणीं नेपोलियन १८२१ पर्यंत जिवंत होता ! इकडे पुनः फ्रान्सच्या गादीवर नेपोलियनला घाबरून पळून गेलेल्या १८ व्या लुईस बसविण्यांत आलें !