पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ . ] फ्रान्सचं लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २५५ आला आहे ही बातमी ऐकतांच संयुक्त राष्ट्रांनी आपापलीं सैन्यें फ्रान्सकडे चोहोंकडून रवाना केलीं; नेपोलियनच्या विरुद्ध सर्व युरोपियन राष्ट्र चालून आलीं असतां जय मिळविणें नेपोलियनला अर्थातच शक्य नव्हतें ! फ्रेंच सैन्य जिवावर उदार होऊन लढत असल्यामुळे नेपोलियनला एखाद दुसऱ्या लढा- ईत कचित् जय मिळे; परंतु सरते शेवटीं या सैन्यापुढें नेपोलियनचा टिकाव न लागून त्यास हार खावी लागणार हें उघड दिसत होतें ! बेलजममध्यें ड्यूक ऑफ वेलिंगटन याच्या हातां- फ्रान्सवर संयुक्त राष्ट्रांची सैन्यें तुटून पडतात १८१५. खालीं इंग्लिश व जर्मन सैन्य तयार असून या सैन्याच्या मदतीसाठीं बरेचसे प्रशियन सैन्य घेऊन मार्शल ब्लचर येत होता. फ्रान्सच्या उत्तर सरहद्दीवर जमत चाललेल्या या सैन्याशी टक्कर देण्याचा नेपोलियननें विचार केला. आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें मोठी चपळाई करून त्यानें ब्लचरच्या हाताखालील प्रशियन सैन्यास एकटें गांठून त्याचा १८ जून रोजीं ' लिग्नी ' येथें मोड केला. यानंतर त्यानें आपल्या हाताखालील मार्शल ग्रुशी या सरदाराच्या हाताखालीं तीस हजार सैन्य देऊन त्यास प्रशियन सैन्याचा पाठलाग करण्यासाठीं पाठवून दिलें व तो स्वतः १८ जून रोजी वेलिंगटनशीं तोंड देण्यासाठी निघाला. वाटरलूची लढाई-१८ जून १८१५. वाटर-लू जवळ एक मजबूत ठिकाण पाहून त्या ठिकाणीं वेलिंगटन फ्रेंच सैन्याशी टक्कर देण्यासाठीं तळ देऊन राहिला होता. नेपोलियननें वेलिंगटनवर जोराचा हल्ला करून त्यास तेथून हांकून लावण्याची बरीच खटपट केली. परंतु त्यास या कामी यश आलें नाहीं. सबंध दिवसभर दोन्ही पक्षांची बरोबरी असतांना सायंकाळच्या सुमारास अकस्मात् रीतीनें ब्रिटिश सैन्यास प्रशियन सैन्य आपल्या मदतीस येत असल्याचें समजलें. एकीकडून प्रशियन सैन्य व दुसरीकडून ब्रिटिश सैन्य यांच्यामध्यें नेपोलियन सांपडल्यामुळे त्याचा पुरा मोड झाला. या परा-