पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लागले. फ्रान्सच्या गादीवर पूर्वीच्या बोरबोन लुईस, १८ वा लुई म्हणून बसविण्यांत येऊन १७९२ मध्ये फ्रान्सच्या पॅरिसचा तह १८१४. देण्यांत आला. वर्चस्वाखालीं असलेला सर्व मुलूख त्याच्या ताब्यांत गेल्या वीस वर्षांत युरोपमध्यें चाललेल्या धुमश्चक्रीनें विस्खळित ● झालेल्या युरोपियन राष्ट्रांची पुनरपि व्यवस्थित रीतीनें कशी मांडणी करा- वयाची याचा विचार करण्यासाठी व्हिएन्ना शहरी सर्व युरोपियन • राष्ट्रांची परिषद भरली होती ! या महत्त्वाच्या बैठकीसाठी युरोपमधील सर्व प्रमुख राष्ट्रांतील मुत्सद्दी आपापल्या राष्ट्रांच्या वतीनें हजर होते ! अशा- प्रकारें युरोपची नवी मांडणी कशी करावयाची याबद्दल या परिषदे- मध्यें वाटाघाट सुंरूं असतां, नेपोलियन एल्बा बेटांतून निसटून फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरला असल्याची अनपेक्षित बातमी या परिषदेपुढें येऊन थडकली ! एल्बा बेटांतून निसटल्यावर पुनः एकदां संयुक्त राष्ट्रांशी निकराची 'टक्कर देण्याचा नेपोलियनचा विचार होता. फ्रान्सच्या किनाऱ्यावर नेपोलियन दाखल झाला आहे हें पाहतांच त्याचे पूर्वीचे जीवावर उदार होऊन लढणारे कितीतरी सैनिक त्यास येऊन मिळाले. नेपोलियनला पकडून आणण्या- साठीं १८ व्या लुईनें पाठविलेला मार्शल ने ह्या सरदाराच्या डोळ्यांत नेपो- लियनची तेजस्वी मूर्ति पाहतांच आनंदाश्रु आले, व त्यास आपण कोणत्या कामासाठी येथें आलों आहोंत याची पार विस्मृति पडून, तो नेपोलियन पुढे हात जोडून उभा राहिला ! नेपोलियननें आपल्या लोको- त्तर सामर्थ्यानें आपली सर्वावर छाप बसवून सर्वांस आपलें अंकित करून सोडलें ! इकडे फ्रान्सच्या गादीवर बसलेला १८ वा लुई यानें नेपोलियन- विरुद्ध लढण्यास आपले सैनिक तयार नाहींत हें पाहतांच फ्रान्समधून पळ काढला, व जगद्विजयी नेपोलियननें फ्रेंच लोकांच्या आनंदकल्होळां- मध्यें पुन: पॅरीस शहरीं प्रवेश केला ! अशाप्रकारें पॅरीस शहरीं नेपोलियन