पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें. ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २५३ खुद्द फ्रान्स देशाचें तरी त्यास संरक्षण करतां येतें कीं नाहीं अशीही शंका वाटू लागली ! संयुक्त राष्ट्रांकडून भालेली तहाची सूचना नेपोलियन फेंटाळून लावतो. नोव्हेंबरच्या ९ व्या तारखेस फ्रँकफोर्ट येथें संयुक्त राष्ट्रानीं नेपो- लियनशीं तहाचें बोलणें लावलें. या तहामध्यें संयुक्त राष्ट्रांनीं मोठ्या उदारतेनें फ्रान्सच्या पूर्वापार असलेल्या चतुःसीमा कबूल केल्या होत्या. उत्तरेकडे व्हाइन नदी, पूर्वेकडे आल्प्स पर्वत व दक्षिणेकडे पिरनीज पर्वत वगैरे फ्रान्सच्या सीमा असाव्यात असें त्यांनीं बोलणें लावलें. परंतु नेपोलि- यनसारख्या महत्त्वाकांक्षी पुरुषास आपला पराभव झाला होता तरी संयुक्त राष्ट्रांनीं आपल्या राष्ट्राच्या अशा सीमा सुचविणें न आवडून त्यानें त्या सूचना फैंटाळून लावल्या ! तेव्हां आतां दुसरा कांहीं इलाज नाहीं हें पाहतांच फ्रान्सवर स्वारी करून नेपोलियनला पदच्युत' करण्याचें संयुक्त राष्ट्रांनी ठरविलें. इतकें झालें तरी नेपोलियननें आपला धीर खचूं दिला नाहीं. आपल्याकडून सैन्याची जय्यत तयारी राखण्याचा त्यानें प्रयत्न केला; परंतु संयुक्त सैन्य अवाढव्य असल्यामुळे नेपोलियनच्या सैन्याचें कांहींच चाललें नाहीं. ता. ३१ मार्च रोजी उत्तरेकडून संयुक्त सैन्य पॅरिसच्या तटाजवळ येऊन दाखल झालें व फ्रेंच सेनापति सुल्ट याचा स्पेनमध्यें पराभव झाल्यानें लॉर्ड वेलिंगटन आपल्या सैन्यानिशीं दक्षिणेकडून पॅरीस शहरानजीक येत होता. अशा प्रकारें आपल्या सर्व सैन्याचा मोड झाला आहे व शत्रुसैन्य पॅरिसच्या तटाजवळ आले असून त्यास प्रतिबंध करण्यास आपण असमर्थ आहोंत हैं पाहून ता. ६ एप्रिल १८१४ रोजीं नेपोलियननें आपण राज्यपद सोडलें असल्याचें जाहीर केलें ! लांगलींच संयुक्त लैन्यानें नेपोलियनला कैद करून एल्बा बेटांत ठेवण्याचें ठरविलें; व नंतर फ्रान्सची नेपोलियन राज्यपद सोडतो - ६ एप्रिल १८१४. काय व्यवस्था करावयाची याविषयीं संयुक्त राष्ट्रांतील मुत्सद्दी विचार करूं