पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण येथें व २० मे रोजी ' बॅटझेन ' येथें त्यास प्रशियन सैन्यांचा पराभवा करितां आला तरी पूर्वी येना व फ्रीडलँड या ठिकाणी मिळविलेल्या जयाच्या मानानें वरील लढायांचें महत्त्व कमीच ठरेल ! कारण नेपोलियनला जरी वरील दोन्हीं ठिकाणीं जय मिळाला होता तरी त्याला शत्रूचा पुरता मोड़ न करतां आल्यामुळे, पराभवानंतरही प्रशियन सैन्य नीट व्यवस्थेनें सॅय- लेशिया प्रांतांत येऊन दाखल झालें. लिपझीकची लढाई- आक्टोबर १८१३. या वेळी रशिया व प्रशिया या संयुक्त सैन्याचें व नेपोलियनच्या सैन्याचें बल बहुतेक सारखे असल्यामुळे आस्ट्रिया ज्या बाजूला जाऊन मिळेल त्या पक्षास तात्काळ जय मिळेल असें दिसूं लागलें ! आस्ट्रियानें आपणास मदत करावी म्हणून दोन्ही पक्ष आपापल्याकडून पराकाष्ठा करीत होते. त्यावेळीं आस्ट्रियाचा मुख्य प्रधान प्रख्यात मुत्सद्दी मेटर्निच याचा युद्ध न करतां दोन्ही पक्षांमध्यें तह घडवून आण- ण्याचा विचार होता; परंतु त्याने सुचविलेल्या तहाच्या कांहीं कलमां- चा नेपोलियननें धि:कार केल्यामुळे मेटर्निचनें प्रशिया व रशिया यांचाच पक्ष स्वीकारण्याचें ठरविलें. आस्ट्रिया आपल्या पक्षास) मिळाल्यावर अर्थातच प्रशिया व रशिया या दोन राष्ट्रांस जोर आला; व ' रशियन, प्रशियन व ऑस्ट्रियन सैन्यानें नेपोलियनला चोहों बाजूंनीं घेरून टाकण्याचें ठरविलें ! नेपोलियनच्या दीड लाख फौजेस शत्रूंच्या अडीच लाख सैन्याशीं टक्कर घ्यावयाची होती ! ता. १६ आक्टोबरपासून तीन दिवसपर्यंत लिपझीक या शहरानजीक दोन्ही सैन्यांची निकराची लढाई होऊन त्यांत नेपोलियनचा पुरा मोड झाल्यानं त्यास आपल्या थोड्या सैन्यानिशीं व्हाइन नदीच्या पलीकडे पळ काढल्या- वांचून गत्यंतरच नव्हतें ! लिपझीकच्या लढाईत नेपोलियनचा मोड झाल्यामुळें जर्मनीवरील त्याचें वर्चस्व नष्ट झालें इतकेंच नव्हे तर आतां