पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें . ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २५१ टिलसीटच्या तहानें प्रशियाच्या सत्तेचा पुरा -हास होऊन त्याची दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीच्या एखाद्या बारक्या संस्थानाप्रमाणें स्थिति झालेली होती; परंतु त्या तसल्या स्थितींतूनही आपण पुनः पूर्वस्थितीत ेऊन जर्मनीमध्यें आपलें वर्चस्व प्रस्थापित करूं अशी आशा प्रशिया- मधील मुत्सद्यांनी सोडून दिलेली नव्हती ! येनाच्या लढाईत नेपो- लियनकडून प्रशियन सैन्याचा पराभव झाल्यानंतर स्टाईन, हार्डेनवर्ग वगैरे देशभक्तांनीं प्रशियाच्या दुर्बळ राजाच्या मंत्रिमंडळांत आपला शिरकाव करून घेतला.. मंत्रिमंडळांत हे नवीन देशभक्त मुत्सद्दी आल्यावर त्यांनीं प्रशियांतील गुलामगिरी मोडून टाकली व कवाईत करून शिकविलेलें राष्ट्रीय सैन्य निर्माण केलें. प्रशियामध्ये अशा प्रकारच्या राष्ट्रीय सुधारणा चालल्या असतां, जेव्हां नेपोलियनच्या अवाढव्य सैन्याचा रशियाच्या बर्फाळ प्रदेशांत नाश झाल्याची बातमी प्रशियाच्या मुत्सद्यांस लागली, तेव्हां त्यांच्या आनंदास सीमाच राहिली नाहीं ! नेपोलियनवर सूड घेण्याची हीच योग्य संधि आहे असें प्रशियांतील प्रत्येक माणसास वाटूं लागलें; व सूड उगविण्यास रशियाच्या झारची मदत अत्यावश्यक आहे असे वाटून १८१३ च्या फेब्रुवारी महिन्यांत प्रशिया व रशिया यांच्यामध्यें तह होऊन लागलीच मार्च महिन्यांत फ्रान्सशीं युद्ध पुका- चण्यांत आलें. १८१२ सालच्या मोहिमेचा असा कष्टप्रद शेवट झालेला पाहून दुसऱ्या कोणत्याही माणसाचें अंतःकरण निराशमय झालें असतें, परंतु निपोलियनची कांहीं तशी स्थिति झाली नाहीं ! निराशा हा शब्दच जणूं काय त्यास माहीत नव्हता ! प्रशिया व रशिया या दोन राष्ट्रांनीं आपल्या विरुद्ध तह केला आहे अशी बातमी त्यास समजतांच त्यानें हरप्रयत्न करून सैन्य जमा केलें; व १८९३ च्या एप्रिल महिन्यांत आपल्या या नवीन सैन्यानिशीं प्रशिया व रशिया यांचा समाचार घेण्याच्या उद्देशानें तो जर्मनीच्या मध्यभागी येऊन दाखल झाला. ता. ३ मे रोजी ' लटझेन '